मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबा दही आईसक्रीम

Photo of Mango Curd Icecream by Sujata Hande-Parab at BetterButter
406
6
0.0(0)
0

आंबा दही आईसक्रीम

Jun-02-2018
Sujata Hande-Parab
480 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबा दही आईसक्रीम कृती बद्दल

आंबा रसाचा आणि दह्याचा वापर करून हे आइस्क्रीम बनवलेले आहे. कंडेन्सड मिल्क, साखर ह्याचा वापर अज्जीबात केलेला नाही आहे. त्याऐवजी मध वापरलेला आहे. हि एक पूर्णतः साखर विरहित, क्रीम विरहित रेसिपी आहे. क्रीम ऐवजी घट्ट दह्याचा वापर केलेला आहे. अतिशय पौस्टिक आणि चविष्ट रेसिपी प्रेत्येकाने बनवून पहिली पाहिजे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हंग दही किंवा चक्का - 1 1/2 कप (दही ४-५ तास कपड्यात बांधून नंतर त्याचा वापर करावा )
  2. आंबा पल्प- 1 कप (ताजे, गोड आणि जाड)
  3. सुका मेवा - १/४ कप
  4. वेलची पूड- 1/2 टीस्पून
  5. मध - 2-3 चमचे
  6. आंबा बारीक तुकडे - 1/4 कप
  7. गार्निशसाठी - मनुका, आंबा पल्प, चॉकलेट सिरप

सूचना

  1. आंबा पल्प किंवा घट्ट रस - आंबे धुवून घ्या, तुकडे करून घ्या, मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत ते वाटून घ्या.
  2. टांगलेले दहीसाठी - मळमळ च्या कापडात ताजे दही ३-४ तास टांगून ठेवा.
  3. एका वाडग्यात आंबा पल्प घ्या. चक्क किंवा टांगून घट्ट केलेले दही घाला. एकदम क्रीमि किंवा नरम होईपर्यंत विस्क किंवा फेटून घ्या.
  4. मध आणि वेलची पूड घालावी. चांगले मिक्स करावे. सुका मेवा आणि आंब्यांचे तुकडे घालावे.
  5. हळू एकत्र करावे.
  6. हवा बंद डब्यात किंवा काचेच्या वाडग्यात (झाकण असलेल्या) घालून डीप फ्रीजरमध्ये ठेवा.
  7. 45 मिनिटांनी डबा बाहेर कडून आइस्क्रीम मिश्रण व्यवस्तिथ ढवळून घ्या. हे आइसक्रीम ला सॉफ्ट क्रीमि होण्यास मदत करते.
  8. प्रतेय्क 45 मिनिटानंतर ३-४ वेळा हे परत करा. आइसक्रीम जमण्यास ६-७ तास किंवा रात्रभर ठेवा.
  9. मनुकांनी, चॉकोलेट सिरप ने सजवा . थंडगार सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर