Photo of Mango Cocoa Marble Cake by Sujata Hande-Parab at BetterButter
339
7
0.0(1)
0

Mango Cocoa Marble Cake

Jun-02-2018
Sujata Hande-Parab
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. ताज्या आंब्याची प्युरी किंवा घट्ट रस - ३/४ कप (हापूस आंबे किंवा कोणताही गोड खूप गर असलेला आंबा)
  2. मैदा - १ १/४ कप + 1 टीस्पून केक टिनला लावण्यासाठी
  3. बेकिंग पावडर- १ टीस्पून
  4. बेकिंग सोडा - १/२ टिस्पून
  5. कोको पावडर - 3 टेबलस्पून. गोड नसलेली
  6. मीठ - एक छोटी चिमूटभर
  7. तेल - १/2 कप + १ टीस्पून केक टिनला लावण्यासाठी
  8. साखर - १/२ कप
  9. व्हिनेगर - १ टीस्पून
  10. वेनिला इससेन्स - १ टीस्पून
  11. दूध - १/४- १/२ कप
  12. कॉफी पावडर - १ टीस्पून
  13. कोमट पाणी - २ १/२ दिड टेबलस्पून कोका-कॉफ़ी मिश्रण बनिवण्यासाठी

सूचना

  1. ओव्हन 180 डिग्री सेल्सियस वर तापवून घ्या.
  2. आंबे धुवून, साल कडून तुकडे करून मिक्सर मध्ये त्यांची प्युरी किंवा रस करून घ्या. चाळणीतून चाळून घ्या. ताजे आणि खूप गर असलेल्या आंब्याचा वापर करा. मी हापूस आंबा वापरला.
  3. सर्व पातळ साहित्य तेल, वॅनिला इससेन्स, आंबा प्युरी, दूध एका मोठ्या वाडग्यात एकत्र करा.
  4. साखर घालावी. साखर विरघळे पर्यंत आणि मिश्रण चांगले एकत्रित आणि हलके बनवण्यासाठी व्यवस्तीत फेटून घ्या.
  5. व्हिनेगर टाका आणि पुन्हा फेटून घ्या. विस्कर चा वापर करा.
  6. एका दुसऱ्या वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्र करणे दोनदा किंवा तीनदा चाळून. काही नको असलेले घटक चाळून निघून जातात आणि पीठ हलके होते. मिठ घालावे. चांगले मिक्स करावे बाजूला ठेवा.
  7. हे चाळून घेतलेले सुखे घटक ओल्या मिश्रणामध्ये हळू हळू टाकून एकत्रित करून घ्या. लागत असल्यास साधे दूध घाला. दूध गरम किंवा थंड नसावे. सगळे पदार्थ नेहमी रूम टेम्परचेर वरच असले पाहिजेत.
  8. हे मिश्रण दोन भागात विभागणे.
  9. वाडग्यात कोको पावडर आणि कॉफी घ्या. किंचीत गरम पाण्यात हळूहळू मिक्स करावे.
  10. अर्ध्या किंवा एका भाग आंबा मैद्याच्या मिश्रणात कोको कॉफीचे मिश्रण घालावे. ते चांगले मिसळावे. ओव्हरमिक्स करू नये.
  11. बेकिंग पॅन वर तेल पसरावा. पिठ भुरभूरून आणि समान रीतीने पसरवा.
  12. एक पीठ लावलेल्या किंवा ग्रीस केलेल्या पॅन मध्ये ¼ आंबा मैदा मिश्रण घालावे.
  13. नंतर ¼ आंबा मैदा आणि कोको मिश्रण एका छोट्या चमच्याने मध्ये मध्ये ड्रॉप करून टाकावे. असे केल्याने तयार केक ला संगमरवरी प्रभाव प्राप्त होतो.
  14. वरून राहिलेले आंबा मैदा मिश्रण घालावे. नंतर ¼ आंबा मैदा आणि कोको मिश्रण एका छोट्या चमच्याने मध्ये मध्ये ड्रॉप करून टाकावे. हीच प्रक्रिया जोपर्यंत केक मिश्रण संपत नाही तोपर्यंत चालू ठेवावी.
  15. थोडेसे टॅप करा जेणेकरून मिश्रण समान रीतीने पसरते आणि काही एअर बब्बल किंवा हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.
  16. 35-40 मिनिटे बेक करावे. टूथ पीक घालून केक चेक करावा. जर ती स्वच्छ बाहेर आली तर केक कूक झाला असे समजावे.
  17. पॅन 5 मिनिटे काउंटरवर ठेवा.
  18. केक उलटा करा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या.
  19. गार्निश करा किंवा काप करून चहा कॉफी बरोबर सर्वे करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pranali Deshmukh
Jun-02-2018
Pranali Deshmukh   Jun-02-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर