लाल सफरचंदाची खीर | Red Apple Kheer Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Red Apple Kheer recipe in Marathi,लाल सफरचंदाची खीर, Sujata Hande-Parab
लाल सफरचंदाची खीरby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

लाल सफरचंदाची खीर recipe

लाल सफरचंदाची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Red Apple Kheer Recipe in Marathi )

  • लाल सफरचंद - 1 मध्यम (किसलेले)
  • बारीक रवा - 1 टेबलस्पून
  • तूप - 1 टेबलस्पून
  • केशर - 1/2 टीस्पून
  • साखर - 1-2 टेबलस्पून. सफरचंदाच्या गोडीनुसार कमी जास्त करा 
  • कोमट फुल फॅट दूध - १ १/४ कप + १/४ कप केसर मिक्सर तयार करण्यासाठी
  • क्रिम - 2 टेबलस्पून
  • वेलची पूड - 1/2 टिस्पून
  • जायफळ पावडर - ¼ टिस्पून
  • काळा मनुका - 2 अंदाजे चिरून
  • काजू तुकडे - १ टेबलस्पून

लाल सफरचंदाची खीर | How to make Red Apple Kheer Recipe in Marathi

  1. गरम पॅन वर बारीक रवा मंद आचेवर सुक्या तपकिरी रंगावर भाजून घ्या. यास ८-९ मिनिटे लागतील.
  2. नॉनस्टिक पॅन वर गरम तूप करून किसलेले सफरचंद घालावे. चांगले मिक्स करावे १ मिनिट शिजू द्या.
  3. भाजलेला रवा घालून मिसळा.
  4. साखर आणि वेलची, जायफळ पावडर घालावी. चांगले मिक्स करावे
  5. कोमट दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. ते नीट ढवळून घ्यावे आणि शिजवावे.
  6. बारीक चिरलेली मनुका, काजू तुकडे, क्रीम टाका. चांगले मिक्स करावे .
  7. थंडगार सर्व्ह करावे

My Tip:

सफरचंद रवा भाजून झाल्यावर सोलून पटकन किसून घ्यावे. किसून जास्त वेळ ठेवले तर काळे पडते.

Reviews for Red Apple Kheer Recipe in Marathi (0)