मुख्यपृष्ठ / पाककृती / नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा

Photo of Orange Semolina halwa in Coconut Milk by Sujata Hande-Parab at BetterButter
743
3
0.0(0)
0

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा

Jun-03-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा कृती बद्दल

स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा हा संत्र्याचा सालीचा किस वापरून केलेला आहे. दूध ऐवजी नारळ दूध वापरले आहे. माईल्ड नारळाचे दूध आणि सुवासिक संत्रे ह्या पासून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. रवा व्यवस्तीत भाजून घ्यावा नाहीतर डिश ची चव बदलून जाईल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक रवा - 3-4 टेबलस्पून
  2. तूप - 2 टेबलस्पून
  3. साखर -2-3 टेबलस्पून
  4. कोमट नारळ दूध - 1 कप शिरा साठी + १/४ कप केशर मिश्रण तयार करण्यासाठी  
  5. वेलची पूड - 1/2 टिस्पून
  6. लहान मनुका - 5-6 अंदाजे चिरून
  7. ऑरेंज झीस्ट किंवा बाहेरील आवरण किसून - १ १/२ टिस्पून
  8. केसर स्ट्रेंड्स - 8- 9

सूचना

  1. केसर दुधाचे मिश्रण - एका लहान वाडग्यात ¼ कप कोमट नारळाचे दूध घ्या. त्यात केसर टाकून चांगले मिक्स करावे
  2. शिरा - रवा मंद आचेवर लाल रंगावर भाजून घ्यावा. त्याला 8-10 मिनिटे लागतील.
  3. तूप घाला. चांगले एकत्र करून घ्या.
  4. वेलची, जायफळ पावडर, साखर, टाकून घ्या. नीट ढवळून घ्यावे
  5. १ कप कोमट नारळ दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. आणि १-२ मिनिट चांगले मिक्स करावे. ज्योत बंद करा
  6. बारीक चिरलेल्या मनुका आणि संत्र्याचा झेस्ट किंवा किसलेले बाहेरील आवरण टाका. चांगले मिक्स करावे शिरा तयार आहे.
  7. केसर ने सजवून आणि गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर