जांभळाचे सरबत | Jambhalache sarbat Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Jambhalache sarbat recipe in Marathi,जांभळाचे सरबत, Pranali Deshmukh
जांभळाचे सरबतby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

जांभळाचे सरबत recipe

जांभळाचे सरबत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jambhalache sarbat Recipe in Marathi )

  • 30 मोठी टपोरी जांभूळ
  • 1 tbs लिंबाचा रस
  • 2 वाटी साखर
  • बर्फाचे तुकडे

जांभळाचे सरबत | How to make Jambhalache sarbat Recipe in Marathi

  1. स्वच्छ धुतलेली जांभळं एका पातेल्यात घ्यावीत. अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
  2. मध्यम आचेवर जांभळे ३-४ मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल.
  3. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा.
  4. हा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी.
  5. साखर भिजेल इतके पाणी घेउन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा.
  6. पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे.
  7. गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सर्व्ह करावे

Reviews for Jambhalache sarbat Recipe in Marathi (0)