अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच | Egg Omelette Cheese Grilled Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Egg Omelette Cheese Grilled Sandwich recipe in Marathi,अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच, Sujata Hande-Parab
अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविचby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच recipe

अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Omelette Cheese Grilled Sandwich Recipe in Marathi )

  • अंडी - 2
  • कांदा मध्यम - १/२ बारीक चिरून
  • टोमॅटो - १/२ मध्यम बारीक चिरलेला (बियाणे आणि लगदा काढून घेतलेला)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून 
  • हळद पावडर - १/२ टिस्पून
  • गरम मसाला - १/२ टिस्पून
  • काळी मिरी - १/२ टिस्पून बारीक कुटलेली 
  • लाल तिखट - १/४ टिस्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल - १/२ टेबलस्पून 
  • सैंडविच ब्राउन पाव - 4 काप
  • चीज काप - 2
  • टोमॅटो स्लाइस - १ टोमॅटो 
  • मेयोनीज - 1 टेबलस्पून (पर्यायी)
  • बटर - 1-2 टेबलस्पून 

अंडा आमलेट चीज ग्रील्ड सैंडविच | How to make Egg Omelette Cheese Grilled Sandwich Recipe in Marathi

  1. एका खोल बाउलमध्ये अंडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिठ, गरम मसाला, लाल मिरची पूड, काळी मिरी पूड आणि हळद घेऊन चांगले फेस येईपर्यन्त विस्क करा.
  2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंडे मिश्रण घालावे समानप्रकारे पसरवा कमी मध्यम गॅस वर बाजू सोडेपर्यंत शिजवून घ्या.
  3. ते पलटी करा आणि दुसऱ्या बाजूला 1 मिनिटासाठी शिजू द्या. हे 2-3 चोकोनी भागात विभागून घ्या.
  4. ब्राऊन ब्रेड च्या तुकड्यावर बटर पसरवून घ्या.
  5. मेयोनेज पसरवा
  6. ब्रेड वर चीज चे स्लाईस आणि ओमलेट ठेवा.
  7. वर काही टोमॅटोची कापे व्यवस्थित लावून घ्या. दुसर्या बटर केलेल्या ब्रेड स्लाईसने झाकून घ्या.
  8. त्यांना इलेक्ट्रिक किंवा कोणत्याही हातातील सँडविच मेकरमध्ये ग्रिल करा
  9. कापून सर्व्ह करावे

Reviews for Egg Omelette Cheese Grilled Sandwich Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo