मुख्यपृष्ठ / पाककृती / अंड्याचे ऑम्लेट

Photo of Omelette by Sujata Hande-Parab at BetterButter
702
3
0.0(0)
0

अंड्याचे ऑम्लेट

Jun-06-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंड्याचे ऑम्लेट कृती बद्दल

आमलेट किंवा मसाला ऑम्लेट हे प्रामुख्याने अंडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ आणि बरेच मसाले घालून केले जाते. अंडे मऊ होईपर्यंत फेट्ले जाते आणि नॉनस्टीक पॅनवर शिजवले जाते. हि एक पारंपरिक रेसिपी आहे जी कधीकधी लंच किंवा डिनरसाठी केली जाते. ब्रेड, चपाती, डाळ भात बरोबर खाऊ शकतो किंवा ते असेच हि खाऊ शकतो. डाएट करणार्यांनी अंड्यातील पिवळा भाग वगळून ऑम्लेट बनवावे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • व्हिस्कीन्ग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी - 2
  2. टोमॅटो - १/२ मध्यम बारीक चिरलेला (बियाणे आणि लगदा काढून घेतलेला)
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - १ टेबलस्पून 
  4. हळद पावडर - १/२ टिस्पून
  5. गरम मसाला - १/२ टिस्पून 
  6. काळी मिरी - १/२ टिस्पून बारीक कुटलेली
  7. लाल तिखट - १/४ टिस्पून
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल - १/२ टेबलस्पून 
  10. कांदा मध्यम - १/२ बारीक चिरून

सूचना

  1. एका खोल बाउलमध्ये अंडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिठ, गरम मसाला, लाल मिरची पूड, काळी मिरी पूड आणि हळद घेऊन चांगले फेस येईपर्यन्त विस्क करा.
  2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंडे मिश्रण घालावे समानप्रकारे पसरवा कमी मध्यम गॅस वर बाजू सोडेपर्यंत शिजवून घ्या.
  3. ते पलटी करा आणि दुसऱ्या बाजूला 1 मिनिटासाठी शिजू द्या.
  4. डाळभात किंवा पाव किंवा चपाती बरोबर गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर