मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याची पुरी

Photo of Eggplant Puri by Sujata Hande-Parab at BetterButter
929
3
0.0(0)
0

वांग्याची पुरी

Jun-06-2018
Sujata Hande-Parab
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याची पुरी कृती बद्दल

वांगे हे संपूर्ण देशात खूप आवडीने खाल्ले जाते. वांग्याच्या विविध प्रजाती बाजारात पाहायला मिळतात. छोटे, मोठे, हिरवे, लांब, काळे, गावठी अस्या वेगवेगळ्या जाती उपलबध असतात. विविध रेसिपी बनवल्या जातात. महाराष्ट्रात भरलेली वांग्याची डिश खुपच प्रचलित आहे आणि सगळ्या घरात तो आवर्जून बनवली जाते. थोडे मसाले घातले कि वांग्याची स्वतःची चव आणखीनच वाढते. वांगे हे मांसल असते ते वापरून विविध डिश बनवता येतात. मी ह्या रेसिपीत वांगे वापरून पुरी बनवलेली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • मायक्रोवेवींग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू पीठ - १ कप
  2. मैदा - १/४ कप
  3. वांग्याची प्युरी किंवा लगदा - (मायक्रोवेव्ह किंवा वाफवलेले किंवा भाजलेले आणि मॅश केलेले) - १/४ कप 
  4. जिरा - १/२ टेबलस्पून जाडसर वाटलेला
  5. ओवा - १/२ टीस्पून जाडसर वाटलेला 
  6. लाल तिखट - 1/2 टिस्पून
  7. घट्ट दही - 1 टेबलस्पून स्वादानुसार मीठ
  8. तेल - पिठासाठी- १ टेबलस्पून + 2 कप तळण्यासाठी
  9. पाणी (पीठ मळण्यासाठी) - 1 टेबलस्पून किंवा आवश्यक असले तरच वापराने 

सूचना

  1. वांगे धुऊन. पुसून घ्यावे. चाकूच्या सहाय्याने त्यावर वर काही उभ्या रेषा चिरून घ्या आणि त्यावर २-३ थेंब तेल लावा. ओव्हनमध्ये भाजून घ्या किंवा शेगडी वॉर भाजून घ्या. थोडे तेल शिंपडून, मीठ लावून, मायक्रोवेव्ह मध्ये हे 8 ते 9 मिनिटे शिजवून घ्या.
  2. गॅस वापरत असल्यास,वांगे सारखे पालटत राहा. गॅसवर घालताना वायर रॅकचा वापर केला जाऊ शकतो.
  3. एकदा थंड झाल्यानंतर ते सोलून घ्यावे आणि ब्लेंडर वापरुन मिश्रण करावे.
  4. एका पातेल्यात गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेल, जिरा आणि ओवा भरड, लाल मिरची पूड, दही, वांग्याचे पेस्ट घ्या. चांगले मिक्स करावे. आवश्यक असल्यासच पाणी घालावे. झाकण ठेवा आणि ५-८ मिनिटे बाजूला ठेवा.
  5. एका कढाईत तेल गरम करावे.
  6. कणिकचे थोडे भाग घ्या आणि बॉल करा. थोडे तेल पोळपाटाला लावून ज्ञावे.
  7. एक गोल ठेवा, थोडे तेल लावून, सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे.
  8. माध्यम कमी आचेवर सर्व बाजूनी सोनेरी ब्राउन होईपर्यंत फ्राय करा.
  9. बटाटा ची भाजी किंवा चण्याच्या भाजी किंवा कोणत्याही कडी बरोबर गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर