मुख्यपृष्ठ / पाककृती / लिंबाचे लोणचे

Photo of Lemon pickle by Sanjula Thangkhiew at BetterButter
7388
182
4.1(0)
0

लिंबाचे लोणचे

Aug-10-2015
Sanjula Thangkhiew
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लिंबाचे लोणचे कृती बद्दल

चटणी आणि लोणच्याशिवाय कोणताही भारतीय आहार पूर्ण होत नाही! एक आंबट आणि मसालेदार लिंबाचे लोणचे बनविण्याची ही एक सोपी पाककृती आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • पंजाबी
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 10

  1. लिंबू 10 ते 12
  2. लाल मिरच्या 4 ते 6 बारीक चिरलेल्या
  3. 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या
  4. लाल मिरची पूड 2 मोठे चमचे
  5. तेल 2 मोठे चमचे
  6. मेथीचे दाणे दीड लहान चमचे
  7. मोहरी 1 लहान चमचा
  8. जिरे अर्धा लहान चमचा
  9. हिंग अर्धा लहान चमचा
  10. हळद पूड अर्धा लहान चमचा
  11. मीठ स्वादानुसार (सुमारे 1 वाटी, शक्यतो सैंधव घ्या)

सूचना

  1. लिंबू व्यवस्थित धुवून घ्या. लिंबू निम्म्या भागांमध्ये कापून घ्या आणि प्रत्येक अर्ध्या भागाचे 2 समान भाग करा.
  2. एका मोठ्या भांड्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये काही लिंबाचे तुकडे ठेवा आणि त्यावर मिठाचा थर द्या आणि पुन्हा लिंबाचे तुकडे ठेवा आणि मिठाचा थर द्या आणि याची सर्व लिंबांसाठी पुनरावृत्ती करा.
  3. ते भांडे घट्ट बंद करा आणि त्याला 2 ते 3 आठवड्यांसाठी एखाद्या खिडकीजवळ हवेशीर जागेत ठेवा.
  4. 2 ते 3 आठवड्यानंतर लिंब मुलायम झालेली असतील.
  5. मेथीचे दाणे भाजा आणि फिरवा आणि त्याची बारीक पूड बनवा.
  6. एका तव्यात तेल गरम करा, त्यात जिरे आणि मोहरीच्या बिया टाका. तडतड वाजू लागल्यानंतर, त्यात लसूण घाला आणि बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  7. मिरच्या घाला आणि मध्यम विस्तवावर परतून घ्या.
  8. आता त्यात रसासह लिंबू घाला आणि 2 ते 3 मिनिटे हलवा.
  9. त्यात लाल मिरची पूड, मेथीची पूड, हिंग आणि हळद पूड मिसळ आणि लिंबांवर व्यवस्थित थर बसेल असे फिरवून घ्या.
  10. विस्तवावरून उतरवा आणि थंड होऊ द्या.
  11. त्यांना बरण्यांमध्ये काढून घ्या आणि रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर