मुख्यपृष्ठ / पाककृती / थाई फ्राइड चिकन राइस विथ बेसिल

Photo of Thai fried chicken rice with basil by archana chaudhari at BetterButter
545
4
0.0(0)
0

थाई फ्राइड चिकन राइस विथ बेसिल

Jun-11-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थाई फ्राइड चिकन राइस विथ बेसिल कृती बद्दल

ही रेसिपी अतिशय पटकन आणि एकदम कमी तेलात होणारी आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • थाई
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन किमा 1/२ किलो
  2. हिरव्या आणि लाल तिखट मिरच्या 5 ते 6
  3. लसूण पाकळ्या 10ते 15
  4. बेसिल चे पाने 1 मोठी वाटी
  5. चिली फ्लेक्स 1 लहान चमचा
  6. पातळ सोया सॉस 1 मोठा चमचा(1 Tbsp)
  7. तेल 1 मोठा चमचा
  8. मीठ चवीुसार
  9. खाताना सोबत घेण्यासाठी सॉस
  10. 1 लाल ताजी मिरची आणि 1 हिरवी ताजी मिरची बारीक गोल काप करून
  11. लसूण पाकळ्या 2 बारीक गोल काप करून
  12. पातळ सोय सॉस 1 लहान चमचा
  13. लिंबू 1/२
  14. शिजलेला भात 2 वाट्या

सूचना

  1. सगळे साहित्य तयार करून ठेवा. मी चिकन ब्रेस्ट घरीच मिक्सर मध्ये फिरवले. तुम्ही चिकन किमा आणू शकता.
  2. मिरच्या आणि लसूण जाडसर टेचुन घ्यावे.
  3. तेल तापल्यावर वरील लसूण ,मिरची टाकून 10 सेकंद हलवा,बेसिल ची पाने टाका.चिकन टाका.चांगले एकत्र करून घ्या.
  4. चिली फ्लेक्स टाका.
  5. 1 मोठा चमचा पातळ सोया सॉस टाका.
  6. मीठ टाका,2 Tbsp पाणी टाका
  7. छान एकत्र करून 4 ते 5 मिनिटे मेडियम गॅस वर ठेवा.
  8. एका वाटीत सॉस साठी दिलेले साहित्य एकत्र करा.
  9. खाताना शिजवलेला तयार भात, थाई फ्रॉईड चिकन आणि सॉस घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर