मुख्यपृष्ठ / पाककृती / आंध्र स्टाईल स्वीट करजुरा

Photo of Andhra Style Sweet Karjura by Deepa Gad at BetterButter
993
3
0.0(0)
0

आंध्र स्टाईल स्वीट करजुरा

Jun-12-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंध्र स्टाईल स्वीट करजुरा कृती बद्दल

महाराष्ट्रात अशाच प्रकारची, चवीची रेसिपी आपण खाजाची बनवतो. पण बनविण्याच्या पद्धतीत थोडा फरक आहे.

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • आंध्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा २०० ग्राम (अडीज कप)
  2. साखर १५० ग्राम (पावणेदोन कप)
  3. बटर/तूप ३० ग्राम
  4. बेकिंग पावडर १/४ च
  5. खायचा सोडा चिमुटभर
  6. पाणी आवश्यकतेनुसार
  7. बदामाचे काप २ च

सूचना

  1. मैदा, बेकिंग पावडर, खायचा सोडा सर्व चाळुून घ्या
  2. त्यात बटर किंवा तूप गरम करून घाला
  3. सर्व हाताने चोळून एकजीव करा
  4. पाणी हवे तेवढे घालून मळा (जास्त घट्ट नको की एकदम मऊ नको, मध्यम होईल असं मळा) झाकून ठेवा तोपर्यंत
  5. एकीकडे कढईत तेल तापत ठेवा
  6. दुसरीकडे साखरेत १ कप पाणी घालुन एकतारी पाक करायला गॅसवर ठेवा
  7. मळलेल्या पिठाचे २-४ भाग करा व त्याचे लांबट गोळे करा
  8. एक इंचाचे सुरीने तुकडे करा
  9. तापलेल्या तेलात कापलेले गोळे तसेच टाका व चांगले खरपूस भाजा
  10. लालसर झाले की गरम पाकात टाका
  11. थोडावेळ मुरले की बॉउलमध्ये काढुन वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर