मुख्यपृष्ठ / पाककृती / कोजागिरी स्पेशल मसाला दूध

Photo of Masala Milk by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
781
2
0.0(0)
0

कोजागिरी स्पेशल मसाला दूध

Jun-16-2018
Shubha Salpekar Deshmukh
3 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोजागिरी स्पेशल मसाला दूध कृती बद्दल

शरद ऋतूतील आश्विन महिन्यात कोजागिरी पोर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी दूध गरम करून त्याला आटवून त्यात काजू,बदाम,पिस्ता,केसर ,साखर,जायफळ,वेलदोडे वगैरे गोष्टी घालून,लक्ष्मीदेवी समोर नैवेद्य म्हणून दाखविले जाते. मध्यरात्री दुधात संपूर्ण चंद्राची किरणे पडू दिले जातात आणि ते दूध मग सगळ्यांना प्राशन करण्यासाठी दिले जाते. अर्ध्या रात्रीपर्यंत जागरण केले जाते.पुराणात व प्राचीन ग्रंथात असे सांगितले जाते की मध्य रात्री नंतर साक्षात लक्ष्मीदेवी येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे' असे विचारून जागी असलेल्या लोकांना धन दान करते, म्हणून या पूर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात. कोजागिरी स्पेशल दूध हे आग्दी पटकन होतं अण खूप छान ही लागतं.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. दूध १ लिटर
  2. काजू + बदाम पावडर १ टेस्पून
  3. केशर
  4. पिस्त्याचे काप २ टीस्पून
  5. अर्धी वाटी साखर
  6. वेलची पावडर १ टीस्पून
  7. जायफळ पावडर १/४ टीस्पून
  8. चारोळी १.५ टेस्पून

सूचना

  1. दूध उकळून, त्यात बाकी सगळे पदार्थ घालून आटवून घ्यावे।
  2. काजू-बदाम पावडर मुळे दूध पटकन घट्ट होतं।
  3. गरम किंव्हा ठंडं करून सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर