मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडे

Photo of Sabudana Vade by Priti Tara at BetterButter
495
4
0.0(0)
0

साबुदाणा वडे

Jun-18-2018
Priti Tara
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडे कृती बद्दल

साबुदाणा + उकडलेला बटाटा व इतर जिन्नस घालून हे वडे बनवून डिप फ्राय केले जातात. उपवासामध्ये शक्यतो प्रत्येक घरात हा पदार्थ बनवला जातोच जातो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १) १ वाटी साबुदाणा 
  2. २) ३ मोठे बटाटे
  3. ३) १/२ वाटी शेंगदाणे
  4. ४) २ हिरव्या मिरच्या
  5. ५) २ छोटे चमचे लिंबू रस
  6. ६)बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. ७) १ छोटा चमचा  जिरे 
  8. ८) १ छोटा चमचा साखर
  9. ९) मीठ चवीनुसार
  10. १०) तेल तळण्यासाठी

सूचना

  1. साबुदाणा ५  तास किंवा रात्रभर भिजू घालावा.  
  2. *चांगला भिजला की त्यातले पाणी काढून  टाकावे.
  3. बटाटे उकडून घ्यावे, साल काढून कुस्करून घ्यावे. 
  4. शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे मिक्सरला  लावूनजाडसर कूट करून घ्यावे.
  5. एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे,  कुस्करलेलाबटाटा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, साखर व  लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून  घ्यावे.
  6. तयार मिश्रणाचे समान गोळे करून घ्यावे.  तळहाथाने दाबून घ्यावे.
  7. एका कढईत तेल गरम करून त्यात वडे  गोल्डनब्राउन तळुन घ्यावे. 
  8. हिरव्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्हकरावे. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर