वेजी बॅग पॅक | Veggie bag pack Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  19th Jun 2018  |  
5 from 3 reviews Rate It!
  • Veggie bag pack recipe in Marathi,वेजी बॅग पॅक, deepali oak
वेजी बॅग पॅकby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

8

3

वेजी बॅग पॅक recipe

वेजी बॅग पॅक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veggie bag pack Recipe in Marathi )

  • तांदुळाचे पीठ एक वाटी
  • मैदा दोन वाटी
  • रवा २ लहान चमचे
  • कोबी एक वाटी
  • गाजर एक वाटी
  • शिमला मिरची लाल व हिरवी प्रत्येकी एक
  • कांदे दोन
  • टोमॅटो रेडचीली ग्रिनचीली साॅस प्रत्येक एक चमचा
  • अर्धा ईंच आले
  • लसूण पाकळी ४/५
  • १हिरवी मीरची
  • तिखट मीठ हिंग व हळद
  • जीरे व मोहरी व कढीपत्ता
  • गरम मसाला लहान चमचा
  • मेयॉनीज दोन मोठे चमचे
  • पाणी व तळणीसाठी तेल
  • कोथिंबीर अर्धीे वाटी

वेजी बॅग पॅक | How to make Veggie bag pack Recipe in Marathi

  1. मैदा व तांदूळ पिठी ,रवा मिक्स करून पाण्याने कणिक मळुन घ्या.
  2. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
  3. आले लसूण व मिरची ठेचून घ्या.
  4. आता पॅन मध्ये तेल तापवून त्यात जीरे,मोहरी,कढीपत्ता घाला.
  5. कांदा व हिंग ,हळद घाला.
  6. सर्व भाज्या घाला.
  7. सर्व साॅस घाला,तिखट व गरम मसाला घालून परतून घ्या.
  8. सर्वात शेवटी मेयॉनीज मीठ व कोथिंबीर घालून कोरडे झाले की सारण तयार
  9. आता कणकेचा लहान गोळा घेऊन लाटा. व बाजूच्या कडा जरा लांब कापून घ्या.
  10. सारण भरून बॅगचा आकार दया.
  11. लांब तुकड्याला पट्याचा आकार देवून बॅगेला लावा.
  12. हि बॅग पॅक तेलात तळून घ्या.
  13. दोन्हीकडनं लालसर तळून तुमची बॅग तयार.
  14. साॅस किंवा चटणी सोबत डब्यात भरून दया.

My Tip:

ह्यात चीज घालून करू शकता.

Reviews for Veggie bag pack Recipe in Marathi (3)

Mahi Mohan kori3 months ago

Wow
Reply

Nayana Palav3 months ago

Excellent
Reply

Anvita Amit3 months ago

wow....testy
Reply