मुख्यपृष्ठ / पाककृती / चणा डाळीची वडी

Photo of Chana Daal Vadi by Priti Tara at BetterButter
689
2
0.0(0)
0

चणा डाळीची वडी

Jun-19-2018
Priti Tara
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चणा डाळीची वडी कृती बद्दल

डाळ वड्यांसाठिच जे साहित्य असत तेच यामध्ये आहे. आतल्या बाजूला ओल्या नारळाची चटणी चाथर असतो जी वडीची चव आणखी जास्त वाढवते. तुम्ही नक्की ही करून पहा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप चणाडाळ ,
  2. ५ ते ६ हिरव्या मिरच्या,
  3. ८ ते १० लसूण पाकळ्या ,
  4. १ इंच आले ,
  5. १० ते १५ कढीपत्ता पाने,
  6. १/२ टिस्पून हळद,
  7. १ टिस्पून जीरे ,
  8. १ टिस्पून तीळ ,
  9. १/२ कप कोथिंबीर बारीक चिरून,
  10. चवीपुरते मिठ
  11. * चटणी साठी साहित्य :
  12. १वाटी ओल खोबर ,
  13. हिरवी मिरची २-३,
  14. कोथिंबीर
  15. एक पाकळी लसूण ,
  16. चवीनुसार मीठ

सूचना

  1. चणा डाळ धुवून घ्यावी. नंतर २ ते ३ तास भिजवावी. चाळणीत ओतून पाणी निथळून टाकावे. डाळ तशीच अर्धा तास ठेवावी म्हणजे बरेचसे पाणी निघून जाईल.
  2. २) मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या (मोडून), आले लसूण, कढीपत्ता आणि थोडेसे मीठ घालून अर्धवट बारीक करावे. उरलेली डाळसुद्धा अशाच प्रकारे अर्धवट बारीक करावी.
  3. ३) वाडग्यात वाटलेली डाळ काढून घ्यावी. चव पाहून मिरची पेस्ट, मीठ घालावे. तसेच चिरलेली कोथिंबीर, हळद आणि जीरे घालून मिक्स करावे.
  4. ४) चटणीच साहित्य एकत्रित मिक्सरमध्ये वाटून चटणी बनवून घ्यावी .
  5. एक सुती कापड पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्याव. ते अंथरून त्यावर डाळीच मिश्रण हाताने गोल जाडसर थापून पसरवाव. आता त्याच्या वरच्या बाजूला सेम तसाच चटणीचा थर पसरवा. वडीच्या एका बाजूने कापड उचलून वडी बनवावी. कुकरमध्ये अथवा चाळणीत नेहमी जशा वडी वाफवून घेतो त्याप्रमाणे १०-१५ मिनिट वडी वाफवून घेणे . अळूवडी प्रमाणेच पातळ वड्या पाडून तव्यावर वड्या shallow fry कराव्यात .
  6. तयार गरमागरम वड्या टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्याव्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर