मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत मटार करंजी

Photo of Green piece Karanji by Bharti Kharote at BetterButter
1149
4
0.0(0)
0

खुसखुशीत मटार करंजी

Jun-21-2018
Bharti Kharote
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत मटार करंजी कृती बद्दल

मटार करंजी ही पाककृती चटपटीत असल्याने सगळयांची आवडीची आहे. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. पाव किलो मटार
  2. एक नारळ
  3. 9/10 हिरव्या मिरच्या
  4. एक छोटी जूडी कोथिंबीर
  5. एक चमचा गोडा मसाला
  6. एक चमचा गरम मसाला
  7. एक चमचा लाल तिखट
  8. एक चमचा आल लसूण पेस्ट
  9. दोन चमचा खसखस
  10. तीन चमचा तीळ
  11. दोन चमचा पीठी साखर
  12. तूप
  13. तेल
  14. जीरे पूड
  15. धने पुड
  16. मीठ
  17. तीन वाटी मैदा
  18. अर्धी वाटी रवा
  19. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात अर्धीवाटी तूपाचे मोहन घालावे...
  2. किंचित मीठ रवा आणि पाणी घालून चांगल मळून घ्याव. .
  3. 15 मी.त्या वर पांढरा कपडा ओला करून झाकून ठेवा
  4. मटार स्वच्छ धूऊन 10मी.ऊकडून घ्या. .
  5. पॅन मध्ये तेल टाकून जीरे पूड हिरवी मिरची आल लसूण पेस्ट खसखस तीळ खोवलेलया नारळा चा खीस परतवून घ्या. ..
  6. त्यात मटार धने पुड गोडा मसाला लाल तिखट घाला. .
  7. साखर गरम मसाला चवीनुसार मीठ घाला. .
  8. हे सगळं चांगल परतवून घ्या. ..
  9. त्यात कोथिंबीर घालून हे सारण गार होण्यासाठी ठेवून द्या. ....
  10. आता आपण मळून ठेवलेल्या कणकेच्या लाटया करून घेवू....
  11. लाटया घेऊन छोट्या पूरया लाटा आणि त्यात सारण भरा...
  12. सारण पूरी च्या अंदाजाप्रमाणे भरावे. ..
  13. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  14. सारण भरलेल्या पूरीला करंजी चा आकार दया. .
  15. बोटांचया साहाय्याने दोन्ही बाजूंनी चांगले पॅक करा. .
  16. तेल तापल्यावर मध्यम आचेवर खमंग करंजी तळून घ्या. ..
  17. आणि टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर