गोड पूरी | Sweet Puri Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet Puri recipe in Marathi,गोड पूरी, Bharti Kharote
गोड पूरीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

3

0

गोड पूरी recipe

गोड पूरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Puri Recipe in Marathi )

  • तीन वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धीवाटी रवा
  • दोन वाटी गुळ
  • एक ग्लास पाणी
  • पाव चमचा जायफळ खिसून
  • पाव चमचा वेलची पूड
  • चिमूटभर मीठ
  • तळण्यासाठी तेल

गोड पूरी | How to make Sweet Puri Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ रवा मिक्स करा.
  2. पॅन मध्ये ग्लास भर पाणी गरम करा..
  3. त्यांत गुळ घालून चांगल हलवा जोपर्यंत गुळ विरघळत नाही. ..
  4. त्यात वेलची पूड जायफळ पूड मीठ घालून पीठात ओता. .
  5. थोडे गार झाल्या वर पीठ चांगल मळून घ्या. .
  6. त्या च्या छोट्या लाटया करून पूरी लाटा. .
  7. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. गुलाबी सर खमंग पूरया तळून घ्या. ..
  9. आणि चहा सोबत गरमागरम सर्व्ह करा. ..

My Tip:

घट्ट गोळा भिजवावा म्हणजे पूरया खुसखुशीत होतात. .

Reviews for Sweet Puri Recipe in Marathi (0)