बीट पुरी | Beetroot puri Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Beetroot puri recipe in Marathi,बीट पुरी, Manasvi Pawar
बीट पुरीby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

बीट पुरी recipe

बीट पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Beetroot puri Recipe in Marathi )

  • दोन मोठे बीट
  • कणीक साधारण चार वाट्या
  • ओवा दोन चमचे
  • जीरे एक चमचा
  • मीठ चवीनुसार
  • लाल तिखट एक चमचा
  • हिंग एक छोटा चमचा
  • तेलाचे मोहन चार चमचे
  • रवा दोन चमचे

बीट पुरी | How to make Beetroot puri Recipe in Marathi

  1. प्रथम बीट सोलून बारीक चिरून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी
  2. मग एका परातीमध्ये कणीक ओवा जिरे मीठ हळद लाल तिखट हिंग आणि तेलाचे मोहन घालावे
  3. आता यामध्ये बीटची पेस्ट घालून घट्ट गोळा मळून घ्या लागले तरच पाण्याचा हात लावावा
  4. आता या पीठाचे किमान १/२ तासांनी छोटे छोटे गोळे करून घ्यावेत
  5. पुरी लाटून घ्या
  6. तेल गरम करून छान तळून घ्या
  7. तयार आहे आपली बीट पुरी

My Tip:

मी यामध्ये कच्चा बीट वापरलाय तुम्ही वाफवून ही घेऊ शकता

Reviews for Beetroot puri Recipe in Marathi (0)