कांदेपोहे समोसा | Kanda poha samosa Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  28th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
  • Kanda poha samosa recipe in Marathi,कांदेपोहे समोसा, deepali oak
कांदेपोहे समोसाby deepali oak
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

5

2

कांदेपोहे समोसा recipe

कांदेपोहे समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda poha samosa Recipe in Marathi )

  • मध्यम पोहे २ वाटी
  • कांदे २ मोठे बारीक चीरून
  • मिरच्या ४ चीरून
  • लिंबूरस १चमचा
  • जीरे /मोहरी
  • हिंग/हळद
  • साखर / मीठ चवीपुरता
  • ओले खोबरे किसुन ३/४ लहान चमचा
  • कोथिंबीर /कढीपत्ता
  • १मोठी वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ
  • अर्धीवाटी रवा
  • तळणीसाठी तेल

कांदेपोहे समोसा | How to make Kanda poha samosa Recipe in Marathi

  1. परातीत मैदा व रवा मीठ घालून एकत्र करा
  2. आता ह्यात दोन लहान चमचे कडकडीत तेलाचे मोहन घाला
  3. घटट पीठ मळून घ्या व झाकून ठेवा.
  4. आता पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा
  5. आता कढईत तेल तापले कि जीरे मोहरी घाला
  6. कांदे व मिरच्या कढीपत्ता परतवा
  7. हिंग हळद व मीठ साखर लिंबूरस घाला
  8. भिजवलेले पोहे घालून परता वरुन कोथिंबीर व खोबरे घाला
  9. कणकेची पोळी लाटून मध्ये कापून समोसा तयार करा त्यात बनवलेले पोहे भरा
  10. आता बनवलेले समोसे मैद्यात जरासे पाणी घालून पेस्ट बनवून ह्या पेस्टने चिकटवून घ्या
  11. गरम तेलात तळून घ्या.

Reviews for Kanda poha samosa Recipe in Marathi (2)

tejswini dhopte3 months ago

Chan
Reply

Nayana Palav3 months ago

Wow
Reply