ब्रेड चा खाकरा | Bread Khakara Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bread Khakara recipe in Marathi,ब्रेड चा खाकरा, जयश्री भवाळकर
ब्रेड चा खाकराby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

ब्रेड चा खाकरा recipe

ब्रेड चा खाकरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Khakara Recipe in Marathi )

  • 4 ब्रेड स्लाइस कडा कापलेल्या
  • 2 चमचे बेसन
  • 1/2 चमचा काळी मिरी पूड
  • 1 चमचा जीरे पूड
  • 3/4चमचा / चवीनुसार मीठ
  • 2चमचे जीरावन मसाला
  • 3 चमचे तेल शेकायला

ब्रेड चा खाकरा | How to make Bread Khakara Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात ब्रेड स्लाइस चुरून घ्या.
  2. ब्रेड च्या चुर्यात मिर पूड,जीरे पूड,आणि मीठ घालून पाण्यानी कणके सारख मळून घ्या.
  3. आता ह्या पिठा चे छोटे गोळे बनवून घ्या.
  4. प्रत्येकी पातळ पोळी लाटा जरूर असल्यास थोडं तेल लावू शकता.
  5. ह्या पोळ्या तव्यावर च आलटून पालटून शेकून घ्या.फ्रेंकी सारख शेकायचे आहे.
  6. ह्या पोळ्या एकावर एक ठेवत चला.
  7. आता हा पोळ्यांचा ढीग उलटून ठेवा म्हणजे सगळ्यात पहली पोळी (खालची) वर येईल.
  8. आता ह्या पोळ्या एक एक करून थोडं तेल लावून पराठा मेकर नी दाबून दाबून क्रिस्पी शेकून घ्या.
  9. ब्रेड च्या प्रत्येक खाखरा वर जीरावन मसाला भुरकवा.
  10. हे खाकरे एयर टाईट डब्यात ठेवा आणि हवे तेव्हा चहा बरोबर किंवा असेच खायला सर्व्ह करा.

My Tip:

पिठात हवे तर थोडी कसुरी मेथी कुसकरून घाला.

Reviews for Bread Khakara Recipe in Marathi (0)