स्टफ्फड आलू टिक्की | Stuffed Aloo Tikki Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Stuffed Aloo Tikki recipe in Marathi,स्टफ्फड आलू टिक्की, Archana Chaudhari
स्टफ्फड आलू टिक्कीby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

स्टफ्फड आलू टिक्की recipe

स्टफ्फड आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Aloo Tikki Recipe in Marathi )

  • वरील कव्हर साठी
  • बटाटे 3 उकडून मॅश केलेले
  • आले पेस्ट 1/2 लहान चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट 1/2 लहान चमचा
  • गरम मसाला 1/2 लहान चमचा
  • फुटाणा डाळीची पावडर 1/2 वाटी
  • मीठ चवीनुसार
  • तेल 1 लहान चमचा
  • स्टफिंग साठी
  • ताजे वाटणे 1 वाटी उकडून मॅश केलेले
  • हिरवी मिरची पेस्ट 1/2 लहान चमचा
  • जिरं 1/4 लहान चमचा
  • कोथिंबीर 2 मोठे चमचे बारीक चिरलेली
  • आमचूर 1/2 लहान चमचा
  • अनार दाना(optiobal) 1 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • ब्रेड क्रम्स 2 मोठे चमचे
  • तेल 2 मोठे चमचे(शॅलो फ्राय करण्यासाठी)

स्टफ्फड आलू टिक्की | How to make Stuffed Aloo Tikki Recipe in Marathi

  1. एक कढईत तेल टाकून आले,मिरची, मॅश केलेला बटाटा घाला.
  2. त्यात गरम मसाला,मीठ,फुटण्याची पावडर टाका.
  3. चांगले मिक्स करून 5 मिनिटे झाकून ठेवा.
  4. गार झाल्यावर एक भांड्यात काढून ठेवा.
  5. स्टफिंग साठी एक कढईत तेल टाका
  6. तेलात जिरे,मिरची पेस्ट,उकडलेला वाटाणा, कोथिंबीर, आमचूर, मीठ, अनार दाणा घाला
  7. चांगले मिक्स करून 2 मिनिटे ठेवून एका वाटीत काढा.
  8. आता बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन गोल वाटीसारखा आकार देऊन त्यात वाटण्याचे मिश्रण भरा.
  9. टिक्की छान बंद करून घ्या.या प्रमाणे सगळ्या टिक्क्या बनून घ्या.
  10. आता प्रत्येक टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घ्या.

My Tip:

तुम्ही स्टफिंग साठी आवडीच्या भाज्या घालू शकता.

Reviews for Stuffed Aloo Tikki Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo