मुख्यपृष्ठ / पाककृती / ओपन फेस्ड सँडविच

Photo of Open-faced Sandwiches by Sanjeeta KK at BetterButter
3354
869
4.8(0)
1

ओपन फेस्ड सँडविच

Aug-14-2015
Sanjeeta KK
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • ग्रीलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 काप - ब्राऊन ब्रेड
  2. 1/2 वाटी चण्याचे पीठ
  3. 1/2 वाटी अंकुरित मुग
  4. 2 हिरव्या मिरच्या
  5. 1 मोठा कांदा
  6. 1 मोठा टोमॅटो
  7. 1 भोपळी मिरची
  8. कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने
  9. 1/2 लहान चमचा चिली फ्लेक्स
  10. 1/4 लहान चमचा हळद पूड
  11. 1/4 लहान चमचा मीठ
  12. 1 चिमूटभर हिंग
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. परतण्यासाठी थोडेसे तेल

सूचना

  1. कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि भोपळा मिरची या सर्व सामग्रीला धुऊन बारीक चिरा.
  2. एक मोठा वाडगा घ्या, त्यात चण्याच्या डाळीचे पीठ, अंकुरित मुग, मीठ, चिली फ्लेक्स, हिंग, हळद घालून चांगले एकजीव होईपर्यंत हलवा.
  3. यात इतके पाणी घाला की मिश्रण ओतले जाण्याइतके जाड बनेल.
  4. तवा गरम करा किंवा सँडविच टोस्टर तयार करा.
  5. ब्रेडला त्रिकोणी कापून प्रत्येक तुकड्याला मिश्रणात बुडवा.
  6. प्रत्येक काप टोस्टरमध्ये ठेवा, नंतर मिश्रणातून थोड्या भाज्या घेऊन ब्रेडवर ठेवा.
  7. आता थोडे तेल शिंपडा आणि ब्रेडला 2 ते 3 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी शिजवा.
  8. या स्वादिष्ट ओपन फेस्ड सँडविचला कॅचप किंवा घरी बनविलेल्या कोणत्याही चटणीबरोबर वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर