मुख्यपृष्ठ / पाककृती / पुडाची वडी /सांभार वडी

Photo of Pudachi vadi by Aarti Nijapkar at BetterButter
2310
1
0.0(0)
0

पुडाची वडी /सांभार वडी

Jul-01-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुडाची वडी /सांभार वडी कृती बद्दल

पुडाची वाडी /सांभार वडी सर्वांच्या परिचयातील व आवडणारी म्हणजे नागपुरी पुडाची वडी किंवा सांबर वडी. सांबर म्हणजे कोथिंबीर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वडीचे आवरण / पारीसाठी
  2. बेसन पीठ १ वाटी
  3. मैदा किंवा गव्हाचे पीठ १/३ वाटी
  4. तेलाचे मोहन १ मोठा चमचा
  5. हळद १/२ लहान चमचा
  6. लाल तिखट १ मोठा चमचा
  7. ओवा १/४ लहान चमचा
  8. मीठ १ लहान चमचा
  9. पाणी गरजेनुसार
  10. आतील सारण
  11. कोथिंबीर जुड्या २
  12. खोबरे किसलेले १/२ वाटी
  13. पांढरे तीळ १/३ वाटी
  14. गोडा मसाला २ मोठे चमचे
  15. किंवा
  16. लाल तिखट १ मोठा चमचा
  17. साखर १ लहान चमचा
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल तळण्यासाठी
  20. पारीवर लावण्यासाठीची पेस्ट
  21. चिंचेचा कोळ १/३ वाटी
  22. गरम मसाला १ मोठा चमचा
  23. लाल तिखट १ लहान चमचा
  24. मीठ १/३ लहान चमचा

सूचना

  1. पारीसाठी / वडीचे आवरण
  2. कोथिंबीर निवडून साफ करा व स्वच्छ धुवून घ्या बारीक चिरून घ्या
  3. तव्यावर पांढरे तीळ भाजून घ्या व त्याची जाडसर कूट करावी किंवा असेही घालू शकता
  4. किसलेले खोबरे भाजून घ्या मग त्याला कुस्करून घ्या
  5. आता चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये भाजून कुस्करून घेतलेले खोबरे , तीलकूट, गोडा मसाला , साखर , मीठ घालून एकत्र करून घ्या
  6. बेसन पीठ व मैदा , हळद , लाल तिखट , ओवा व मीठ एकत्र करून घ्या मग त्यात गरम तेल म्हणजे मोहन घाला व एकजीव करून घ्या आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मळून घ्या बाजूला ठेवून द्या
  7. आता पारीवर लावण्यासाठी चिंचेचा कोळ , गरम मसाला, लाल तिखट , मीठ सर्व एकजीव करून घ्या
  8. आता पारी लाटून घ्या त्यावर चिंचेचा कोळीचा पेस्ट पसरवून घ्या
  9. मग सारण मधोमध घाला व पुडी बनवून घ्या
  10. अश्याप्रकारे पुड्या बनवून घ्या
  11. कढईत तेल घालून कडकडीत तापवून घ्या मग मंद आच करू त्यात पुड्या घालून तळून घ्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत दोन्ही बाजुंनी तळून घ्या
  12. गरमागरम सांभार वडी तयार आहे त्याचे गोलाकार मध्ये कापून घ्या
  13. कटाची आमटी सोबत सर्व्ह करावे किंवा चटणी सोबत खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर