झणझणीत ऊंबर फूल | Momos with Spaicy Curry Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  2nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Momos with Spaicy Curry recipe in Marathi,झणझणीत ऊंबर फूल, Bharti Kharote
झणझणीत ऊंबर फूलby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    8

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    90

    मि.
  • किती जणांसाठी

    7

    माणसांसाठी

8

0

झणझणीत ऊंबर फूल recipe

झणझणीत ऊंबर फूल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Momos with Spaicy Curry Recipe in Marathi )

  • पाव किलो चनाडाळ
  • पाव किलो गव्हाचे पीठ
  • 100 ग्रॅम बेसन पीठ
  • पाव चमचा ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड
  • दोन चमचा लाल तिखट गरम मसाला
  • एक चमचा आल लसूण हिरवी मिरची पेस्ट
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • फोडणी साठी तेल जीरे मोहरी
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • एक चमचा खसखस
  • अर्धी वाटी खोबरे खीस

झणझणीत ऊंबर फूल | How to make Momos with Spaicy Curry Recipe in Marathi

  1. 7/8 तास चना डाळ भिजवून चाळणीत काढून घ्या. .
  2. एका वाडग्यात गव्हाचे पीठ बेसन पिठ घेऊन त्यात मीठ घालून कणिक भिजवा. .आणि 15 मी.बाजूला ठेवून द्या. .
  3. सारणासाठी. ...भिजवलेली डाळ घ्या. .
  4. पाणी नितरलयावर डाळ मिक्सर मधून वाटून घ्या. .
  5. नंतर आल लसूण हिरवी मिरची ची पेस्ट लाल तिखट गरम मसाला हळद मीठ हिंग ओवा जीरे पूड धने पुड घालून मिक्स करा..
  6. आता कूकर च्या डब्याला तेलाचा हात लावून मिश्रण त्यांत ओतून दया. ..शिट्टी काढून 15 मी.वाफवून घ्या. ..
  7. गार झाल्या वर त्यात खोबरे खीस भाजलेली खसखस कोथिंबीर लाल तिखट घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  8. भिजवलेली कणिक च्या छोट्या पूरया लाटून त्यात सारण भरा आणि मोदकाचा आकार देवून ऊंबर फूलं बनवा. .चाळणीला तेलाचा हात लावून पॅन मध्ये पाणी घालून त्या वर चाळणी ठेवून झाकण लावून 15 मी.वाफवून घ्या. .
  9. त्या वर जीरे मोहरी ची फोडणी घाला. .
  10. आणि झणझणीत रस्सा सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

यात सारणासाठी तूम्ही चना डाळ ऐवजी नूसत कांदा खोबरे खसखस तीळ गरम मसाला वापरू शकता. .

Reviews for Momos with Spaicy Curry Recipe in Marathi (0)