ग्नूची तिरंगी पास्ता | Gnuchi tricolour pasta Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Gnuchi tricolour pasta recipe in Marathi,ग्नूची तिरंगी पास्ता, Archana Chaudhari
ग्नूची तिरंगी पास्ताby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

0

0

ग्नूची तिरंगी पास्ता recipe

ग्नूची तिरंगी पास्ता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gnuchi tricolour pasta Recipe in Marathi )

  • पास्ताला लागणारे साहित्य
  • गहू पीठ 3 वाट्या
  • बेसन पीठ 1 वाटी
  • तेल 3 चमचे
  • मीठ चवीनुसार
  • बॅकिंग पावडर 1/4 चमचा
  • गाजर उकडून पेस्ट केलेली 1 वाटी
  • बीतरूट उकडून पेस्ट केलेली 1 वाटी
  • पालक उकडून पेस्ट केलेला 1 वाटी
  • तेल 1 चमचा
  • पास्ता सॉस साठी
  • कांदे 2 मोठे बारीक चिरलेला
  • टोमॅटो 3 मोठे पेस्ट केलेली
  • लसूण 2 मोठे चमचे बारीक चिरून
  • हिरव्या मिरच्या 5 बारीक चिरलेल्या
  • कॉर्न दाणे उकडून 1/2 वाटी
  • सिमला मिरची 1/2 वाटी बारीक चिरलेली
  • गाजर 1/2 वाटी उकडून बारीक चिरलेला
  • टोमॅटो केचप 1/2 वाटी
  • ऑरेंगानो 2 चमचे
  • चिली फ्लॅक्स 2 चमचे
  • तेल 2 मोठे चमचे
  • मीठ चवीनुसार
  • चीज क्यूब 4

ग्नूची तिरंगी पास्ता | How to make Gnuchi tricolour pasta Recipe in Marathi

  1. सगळे पीठे, तेल,मीठ,बेकिंग पावडर एकत्र करून त्याचे 3 सारखे भाग करून ठेवा.
  2. पेस्ट तयार ठेवा.
  3. आता 1 एका भागात गाजर पेस्ट टाका, दुसऱ्या भागात बीटरूट ची पेस्ट,आणि तिसऱ्या भागात पालक पेस्ट घाला .गोळे बनवून 10 मिनिटे डब्यात ठेऊन द्या.
  4. पास्ता सॉस बनवण्यासाठी कढईत तेल टाका त्यात बारीक चिरलेला लसूण,बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका जास्त परतवू नका.
  5. आता कांदा टाका तो पण पारदर्शक होईपर्यंत परता,थोड्यावेळाने टोमॅटो पेस्ट टाका.
  6. चांगले परतवून घ्या.तेल सुटू लागल्यावर टोमॅटो केचप टाका.
  7. ऑरेंगानो, चिली फ्लॅक्स टाका. मीठ टाका.
  8. मक्याचे दाणे,सिमला मिरची ,गाजर चे तुकडे टाका.
  9. छान परतवून बाजूला ठेवून द्या.
  10. आता पास्ता बनवण्यासाठी एका मोठया भांड्यात पाणी गरम करायला ठेवा.
  11. तिन्ही रंगापैकी एक गोळा घेऊन त्याला लांब वळा,याप्रमाणे सगळ्या रंगाचे वळून घ्या
  12. आता सुरीने 1 सेंटीमीटर च्या अंतराने काप द्या.
  13. कापलेल्या पैकी एक तुकडा घेऊन त्याला फॉर्क च्या मागील बाजूवर ठेऊन हळूच दाब द्या.तुकड्याला पीठ लावा.
  14. याप्रमाणे....
  15. सगळ्या रंगांचे बनवून घ्या.
  16. ह्या बनलेल्या ग्नूची पास्ता उकळीच्या पाण्यात थोडे मीठ टाकून 20 मिनिटे उकळून घ्या.
  17. नंतर पाणी काढून टाका आणि 1 चमचा तेल टाका.
  18. वर बनवलेल्या मसाल्यात ग्नूची पास्टात टाका आणि 5 मिनिटे कमी आचेवर झाकून ठेवा.
  19. सर्व्ह करताना वरून चीज किसून घाला.
  20. गरम गरम खा.

My Tip:

तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता.

Reviews for Gnuchi tricolour pasta Recipe in Marathi (0)