मुख्यपृष्ठ / पाककृती / मेतकूट: मॅजिक टेस्ट

Photo of METKUT by Minal Sardeshpande at BetterButter
710
6
0.0(0)
0

मेतकूट: मॅजिक टेस्ट

Jul-05-2018
Minal Sardeshpande
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेतकूट: मॅजिक टेस्ट कृती बद्दल

वेगवेगळ्या धान्यांचं असं टेस्टी मिश्रण जे आपण ज्या पदार्थात वापरू त्याला अप्रतिम चविष्ट बनवते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. चणाडाळ पाव की
  2. उडीद डाळ पाव की
  3. हिरवा वाटाणा पाव की
  4. तांदूळ 100 ग्रॅम
  5. गहू 100 ग्रॅम
  6. धने अर्धी वाटी
  7. जीरं अर्धी वाटी
  8. सुंठ पावडर दीड चमचा
  9. हिंग एक चमचा
  10. मोहोरी दीड चमचा
  11. मेथी दीड चमचा
  12. तिखट एक चमचा
  13. हळद एक चमचा

सूचना

  1. चणा डाळ, उडीद डाळ, हिरवा वाटाणा, गहू,तांदूळ, मेथी, धने, जीरं वेगवेगळं खमंग भाजून घ्या.
  2. गॅस बंद करून गरम कढईत मोहोरी परतून घ्या.
  3. भाजून तयार
  4. सर्व एकत्र करून बारीक दळून आणा.
  5. दळलेल्या पिठात हळद पावडर, सुंठ पावडर, हिंग पावडर, तिखट हेसर्व नीट मिक्स करा.
  6. तयार मेतकूट घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
  7. तयार मेतकूट
  8. हे मेतकूट नुसते दह्यात कालवून किंवा तोंडली, पडवळ, दुधी, पडवळ बिया हे वाफवून, कांदा घालून दह्यातील भरीत करताना मेतकूट घालून मस्त लागते.
  9. पडवळाचे भरीत मेतकूट घालून
  10. सकाळी मऊभातात तूप मेतकूट घालून अप्रतिम लागते.
  11. भडंग करताना तेलात तिखट मीठ आणि मेतकूट कालवून लावून चुरमुरे फोडणीत परता मस्त चव येते.
  12. भडंग

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर