दाल ढोकली | Dal dhokli Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal dhokli recipe in Marathi,दाल ढोकली, Archana Chaudhari
दाल ढोकलीby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

दाल ढोकली recipe

दाल ढोकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal dhokli Recipe in Marathi )

  • गहू पीठ ३वाट्या
  • बेसन पीठ १ वाटी
  • बेकिंग पावडर १/४ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल ३ चमचे
  • गाजर उकडून पेस्ट करून १ वाटी
  • पालक उकडून पेस्ट करून १ वाटी
  • बिट उकडून पेस्ट करून १ वाटी
  • तूरडाळ शिजवून घेतलेली २ वाट्या
  • तिखट १ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • जिरे १/२ चमचा
  • मोहरी १/२ चमचा
  • हिंग १/४ चमचा
  • कढीपत्ता पाने ४
  • चिंच कोळ २ चमचे
  • गूळ २ चमचे
  • तेल २ चमचे

दाल ढोकली | How to make Dal dhokli Recipe in Marathi

  1. सगळे पीठे ,मीठ,बेकिंग पावडर, तेल एकत्र करून,३ सारखे भाग करा.
  2. गाजराची पेस्ट एका भागात, पालकाची पेस्ट दुसऱ्या भागात आणि बीट रूट ची पेस्ट तिसऱ्या भागात टाका.
  3. चांगले मळून घेतल्यावर तिन्ही गोळे एका डब्यात १० मिनिटे झाकून ठेवा.
  4. आता प्रत्येकाची वेगळी अश्या ३ पोळ्या लाटा, आणि सुरीने चौकोनी कापून घ्या.
  5. कढईत तेल टाकून तापल्यावर जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता टाका.
  6. शिजवलेली तुरीची डाळ टाका.
  7. तिखट,मीठ,चिंच कोळ टाका.
  8. शेवटी गूळ टाका
  9. चांगली उकळी आली की वरील कापलेले चौकोनी तुकडे टाका.
  10. ३ ग्लास गरम पाणी टाकून २० मिनिटे उकळू द्या.
  11. गरम गरम खा तूप टाकून :blush:

My Tip:

तुम्ही गरम मसाला टाकू शकता.

Reviews for Dal dhokli Recipe in Marathi (0)