कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी) | Kulith flour shev Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kulith flour shev recipe in Marathi,कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी), Bharti Kharote
कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी)by Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी) recipe

कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kulith flour shev Recipe in Marathi )

  • दोन वाटी कुळीथ चे पीठ
  • अर्धी वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धी वाटी बेसन पीठ
  • लसूण पेस्ट एक टेबलस्पून
  • 4/5 हिरव्या मिरच्या कोथंबीर ची पेस्ट
  • अर्धी वाटी शेंगदाणे कूट
  • एक चमचा लाल तिखट
  • पाव चमचा हळद
  • जीरे पूड धने पुड हिंग पाव चमचा
  • चवीनुसार मीठ
  • फोडणी साठी - तेल एक मोठा चमचा
  • जीरे एक टीस्पून
  • लाल तिखट एक चमचा
  • हिंग हळद पाव चमचा
  • पाणी आवश्यकतेनुसार
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे कुळीथ च्या पीठाची पेस्ट

कुळीथ पीठाचे शेव (शेंगोळी) | How to make Kulith flour shev Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात तिन्ही पीठ मिक्स करा..
  2. त्यात लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कोथंबीर पेस्ट लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड हिंग आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून पीठ मळून घ्या. .
  3. एका मोठ्या पातेल्यात तेल टाकून जीरे लसूण पेस्ट लाल तिखट हळद मीठ घालून पाणी घाला. .
  4. त्यात कुळीथ ची पेस्ट घालून ऊकळू दया...
  5. तोपर्यंत पोळपाटाला पीठ लावून शेंगोळी वळून घ्या. .
  6. ऊकळी आल्या वर पातेल्यात सोडा. .
  7. चांगल शिजू दया. .25 मी.शीजू दयाव..
  8. आणि गरम गरम भाकरी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

शेंगोळी शिजणयासाठी वेळ जास्त लागतो त्या मुळे आमटीत पाणी भरपूर घालावे. ...

Reviews for Kulith flour shev Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo