मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट

Photo of Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits by Vaishali Joshi at BetterButter
1014
3
0.0(0)
0

खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट

Jul-08-2018
Vaishali Joshi
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट कृती बद्दल

ही पाककृती अतिशय पौष्टिक , उर्जा उत्पन्न करणारी आहे .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ १ /२ कप
  2. मक्या चे पीठ १/२ कप
  3. डेसीकेटेड कोकोनट १/२ कप
  4. खजूर १ कप
  5. दूध १/४ कप पेक्षा थोड़े कमीच
  6. साजुक तूप २ चमचे मोहन साठी
  7. कुटलेली बड़ी शोप १/४ चमचा
  8. ओवा १/४ चमचा
  9. कुटलेले मीरे १/४ चमचा
  10. वेलची पावडर १/२ चमचा
  11. बेकिंग सोडा चिमुटभर
  12. बेकिंग पावडर १/४ चमचा
  13. थोड़े साजुक तूप शालोफ्राय करण्य़ासाठी

सूचना

  1. प्रथम दुधात खजूर टाकुन मिक्सर मधे वाटुन घ्या मिरे , बडीशोप जाडसर कुटून घ्या
  2. आता मक्याचे पीठ आणि कणिक ( गव्हाचे पीठ )एकत्र करुन त्यात डेसीकेटेड कोकोनट , बड़ी शोप , मिरे , ओवा , वेलची पावडर , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर घालून मिक्स करा
  3. त्यात पातळ केलेले साजुक तूप घालून पिठाला चोळून घ्या
  4. त्यात बारीक़ केलेला खजूर घालून पीठ भिजवून घ्या . १५ मिनिट झाकून ठेवा
  5. १५ मिनिटांनी भिजवून ठेवलेल्या पीठाचे हाताने आवडीच्या आकारात छोटे छोटे बिस्किटे करुन घ्या
  6. पैन वर मंद आचेवर सर्व बिस्किटे थोड़े थोड़े तूप साइड ने सोडून गुलाबी रंगावर शालोफ्राय करा . मस्स्त खुसखुशीत असे बिस्किटे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर