मुख्यपृष्ठ / पाककृती / गवसणीच्या पोळ्या

Photo of GAVASANICHI poli by Minal Sardeshpande at BetterButter
555
4
0.0(0)
0

गवसणीच्या पोळ्या

Jul-09-2018
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवसणीच्या पोळ्या कृती बद्दल

दोन पिठं वेगळ्या पद्धतीने एकत्र करून केलेली लुसलुशीत पोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी तांदूळ पिठी
  2. एक वाटी पाणी
  3. मीठ
  4. अर्धा चमचा लोणी
  5. तीन वाट्या कणिक
  6. मीठ कणकेत घालायला
  7. दोन चमचे तेल
  8. पाणी कणिक भिजवण्यासाठी
  9. थोडी सुकी कणिक

सूचना

  1. एक परातीत कणिक चवीनुसार मीठ आणि तेल घालून नेहमीच्या पोळीला लागते तशी भिजवा.
  2. झाकून ठेवा.
  3. एक कढईत पाणी उकळत ठेवा.
  4. त्यात चवीनुसार मीठ आणि लोणी घाला.
  5. उकळी आली की गॅस मंद करा.
  6. तांदूळ पिठी घाला, ढवळा आणि पाच मिनिटं वाफ काढा.
  7. उकड गार होऊ द्या.
  8. गार झाल्यावर नीट मळा.
  9. लिंबाएवढा उकडीचा गोळा घ्या.
  10. कणकेची वाटी करून त्यात पूरण पोळी प्रमाणे उकडीची गोळी भरून नेहमीच्या पोळीप्रमाणे सुक्या कणकेवर लाटा.
  11. असं भरा
  12. आता लाटलेली पोळी तव तापवून नेहमीप्रमाणे भाजा.
  13. तयार पोळी अतिशय लुसलुशीत होते.
  14. शेवयांच्या खिरी सोबत किंवा आमरसा सोबत अप्रतिम लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर