मिक्स पिठाचा उपमा | Upma Recipe in Marathi

प्रेषक kalpana modke  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upma recipe in Marathi,मिक्स पिठाचा उपमा, kalpana modke
मिक्स पिठाचा उपमाby kalpana modke
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

About Upma Recipe in Marathi

मिक्स पिठाचा उपमा recipe

मिक्स पिठाचा उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upma Recipe in Marathi )

  • १ वाटी गव्हाचे पीठ .
  • 1/2 वाटी ज्वारीचे पीठ
  • १ /२ वाटी बेसन
  • १ वाटी कांदा
  • ४ हिरव्या मिरच्या
  • १/२ छोटा चमचा लाल तिखट
  • १/२ छोटा चमचा हळद
  • मीठ चवीनुसार
  • २ मोठे चमचे तेल
  • १ चमचा जिरं
  • १ चमचा मोहरी
  • ४ /५ पानं कढिपत्ता
  • १ ग्लास पाणी

मिक्स पिठाचा उपमा | How to make Upma Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व पिठे कोरडी भाजून घेणे
  2. कढईत तेल टाकून फोडणी तयार करा .
  3. कांदा गुलाबी परतून घ्या .
  4. लाल तिखट व हळद टाकून कालवा .
  5. त्यात भाजलेली पीठे एकत्र करून टाका .
  6. चांगले परतून घ्या .
  7. त्यात मीठ टाका .
  8. त्यात गरजेनुसार गरम पाणी ओता .
  9. ५ मिनिटे झाकन ठेऊन एक वाफ काढून घ्या .
  10. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा .

Reviews for Upma Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo