मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा | Mix Flour Healthe Dosa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix Flour Healthe Dosa recipe in Marathi,मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा, Bharti Kharote
मिक्स पिठांचा पौष्टिक डोसाby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

4

0

मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा recipe

मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Flour Healthe Dosa Recipe in Marathi )

  • 2 कप बेसन पिठ
  • 1 कप तांदुळाचे पिठ
  • 1/2 कप गव्हाचे पिठ
  • 1/2 कप जवारीचे पिठ
  • दीड कप दही
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर खायचा सोडा
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • अर्धा कप कोथिंबीर चिरून
  • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून

मिक्स पिठांचा पौष्टिक डोसा | How to make Mix Flour Healthe Dosa Recipe in Marathi

  1. एका पातेल्यात सर्व पीठं घ्या. .त्यात दही मीठ खायचा सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणि घालून बॅटर तयार करा. .
  2. त्यांत चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घाला. .
  3. बॅटर चांगले फेटून घ्या. .15 मी.बाजूला ठेवा. .
  4. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा. .त्या वर थोडे तेल टाकून पळीने बॅटर सोडा. .आणि डोसा करा..
  5. कडे कडे ने तेल सोडून चांगले मंद आचेवर शॅलो फ्राय करा. .तसेच दुसरी बाजू पलटी करून शॅलो फ्राय करा. .
  6. झाला पौष्टिक डोसा तयार. ..बटाटा भाजी सोबत सर्व्ह करा. ...

My Tip:

हा पौष्टिक डोसा तूम्ही कोकोनट चटणी सोबत किंवा सांबार सोबत खाल्ला तर अजून छान टेस्ट लागते. .

Reviews for Mix Flour Healthe Dosa Recipe in Marathi (0)