मुख्यपृष्ठ / पाककृती / तीन पिठाचे शेंगुळे ( रिंग )

Photo of Rings by priya Asawa at BetterButter
311
1
0.0(0)
0

तीन पिठाचे शेंगुळे ( रिंग )

Jul-11-2018
priya Asawa
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तीन पिठाचे शेंगुळे ( रिंग ) कृती बद्दल

लहान व मोठे दोघांना आवडनारा रुचकर आणि हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी ज्वारी चे पीठ
  2. 1 वाटी गव्हाचे पीठ
  3. 1 वाटी बेसन पिठ
  4. लाल तिखट 1 चमचा
  5. हळद पावडर 1 चमचा
  6. गरम मसाला 1 चमचा
  7. धन्याची पावडर 1 चमचा
  8. लसूणपेस्ट 2 चमचे
  9. तेल 3 चमचे
  10. मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता फोडणी साठी
  11. लिंबू , कांदा व कोथिंबीर वरुन घालण्यासाठी

सूचना

  1. एका बाऊल मध्ये तिन्ही पिठ घेऊन एकत्र करा
  2. मिक्स केलेल्या पिठात 1 चमचा लाल तिखट, हळद, धने पावडर, लसूण पेस्ट, व चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  3. आवश्यकतानुसार पाणी घालून पिठ घट्ट मळून घ्या
  4. पिठाचे अश्या प्रकारे रिंग तयार करून घ्या
  5. एका कडाईत पाणी गरम करायला ठेवा व पाण्याला एक उकळी आली की पाण्यात एक चमचा तेल घाला व तयार केलेले रिंग टाका
  6. अश्या प्रकारे रिंग व्यवस्थित शिजवून घ्या
  7. रिंग शिजले कि ते एका चाळणीत टाकून पाणी निथळून घ्या
  8. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
  9. तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी द्या मग त्याचात लाल तिखट, हळद, गरम मसाला,चवीनुसार मीठ व रिंग घालुन चांगले परतुन घ्या
  10. बारिक चिरलेली कोथिंबीर घालून थोडे आजुन परतुन घ्या आपले खमंगी रिंग तयार आहे लिंबू व कांद्या बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर