मुख्यपृष्ठ / पाककृती / Five flour coloured Litti /Bati

Photo of Five flour coloured Litti /Bati by Jayshree Bhawalkar at BetterButter
755
3
0.0(1)
0

Five flour coloured Litti /Bati

Jul-11-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • बिहार
  • बेकिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप बाटी च रवाळ गव्हा च पिठ
  2. 1/2 कप ज्वारी चे पिठ
  3. 1/2 कप बाजरी पिठ
  4. 1/2 कप मक्याचे पिठ
  5. 1/4 कप सातू चे पिठ
  6. 1/4 चमचा बेकिंग पावडर
  7. 1/2 कप घरची दुधा ची साय/क्रीम
  8. 1/4 चमचा जिरे
  9. 1/4 चमचा हळद
  10. 1/4 चमचा लाल तिखट
  11. 1/2 चमचा मिठ
  12. 2 कप साजूक तूप

सूचना

  1. .सगळं साहित्य एकत्र जवळ ठेवा
  2. सगळे साहित्य जवळ ठेवा.
  3. आता सगळ्या पिठांन मध्ये एक एक चिमूट मिठ,1/2 चमचा साय आणि एक एक चिमूटभर बेकिंग पावडर घाला ,फक्त गव्हाच्या पिठात 1 चमचा साय घाला.
  4. आता एक एक करून प्रत्येक पिठात घातलेले जिन्नस नीट मिक्स करून पाण्यानी थोडी सैल म्हणजे पोळ्यां सारखी कणिक मळून घ्या आणि 10 मिनिट झाकून ठेवा.
  5. आता सातू च्या पिठात 1चमचा तूप,जिरे,तिखट आणि चवीनुसार मिठ लागले तर 1 चमचा पाणी घालून मिक्स कराआणि छोटे छोटे गोळे करून घ्या.
  6. आता आम्हाला बाटी बनवायची आहे. आधी आम्ही प्रत्येक पिठा च्या हातानेच छोट्या पुऱ्या बनवून घेऊ आणि रंग संगती यावी म्हणून  अंदाजे एक  गडद रंग एक फिक्का रंग आपल्या आवडीनुसार ठेवू.
  7. मी आधी गव्हा ची पूरी त्यावर सातू पिठाची गोळी,मग ज्वार,मक्का,आणि बाजरा ची पुरी घेतली आहे.थोडं क्रम चित्रा प्रमाणे बदलू पण शकता .
  8. बाटी बनवायची विधी नंबर 1- एका वर एक पोळ्या आणि वर सातू पीठा ची गोळी ठेवून तुपाचा हात लावून पुरणाच्या पोळी सारख बंद करून घ्यावे.
  9. बाटी बनवायची विधी नंबर 2 - पहले सातू पिठाच्या गोळी  गव्हाची पोळी नी बंद करायची,मग ह्यावर ज्वारी ची पूरी, मग मक्याची मग बाजरी ची पूरी नी आतला गोळा बंद करायचा ,थोडं आतलं पिठ दिसत असले तरी काही हरकत नाही.
  10. आता पुन्हा सगळ्या बाटी न वर तूप लावा.
  11. मायक्रोवेव्ह कनवेकशन मोड वर 200℃ वर प्री हीट करून 180℃ वर लो रॅक वर 15 मिनिट बेक करायला ठेवा.
  12. 15 मिनिटांनी सर्व बाटी पालटून ठेवा प्रत्येकावर थोडं तूप  घाला आणि परत 10 मिनिट 180℃ वर बेक करा.
  13. लिट्टी /बाटी तुपात बुडवून काढा .
  14. आता बाटी चे चाकूने मधून दोन भाग करा आपल्याला पिठांची कमाल दिसेल म्हणजेच रंगीत बाटी दिसेल.
  15. पंच पिठा ची रंगीत बाटी पंच डाळीच्या वरणा सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mukta Deolalikar
Jul-11-2018
Mukta Deolalikar   Jul-11-2018

खूप छान आईडिया आहे मि एकच आटे ची केली आहे

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर