चाचणीतली करंजी | Chachnichi Karanji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  12th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chachnichi Karanji recipe in Marathi,चाचणीतली करंजी, Maya Ghuse
चाचणीतली करंजीby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

चाचणीतली करंजी recipe

चाचणीतली करंजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chachnichi Karanji Recipe in Marathi )

  • मैदा 1 वाटी
  • खवा अर्धी वाटी
  • पिठीसाखर अर्धा वाटी
  • साखर 1 वाटी
  • काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार
  • विलायची पावडर पाव चमचा
  • खोबरा किस अर्धी वाटी
  • तूप 2 चमचे
  • केसर सिरप 4 थेंब
  • कॉर्नफ़्लेावर पाव वाटी
  • तेल 3 वाट्या तळणासाठी

चाचणीतली करंजी | How to make Chachnichi Karanji Recipe in Marathi

  1. मैदा घेवून त्यात चिमूटभर मिठ, कॉर्नफ़्लेावर, तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. खवा भाजून त्यात पिठी साखर, खोबरा किस, ड्रायफ्रूट, केसर सिरप,विलायची पावडर टाकून मिसळून घेतलं
  3. 15-20 मी. मैद्याची पोळी लाटून त्यावर तूप व कॉर्नफ़्लेावरचं मिश्रण लावून दूसरी पोळी ठेवून त्यावर मिश्रण लावून रोल केला व त्याचे तुकडे करून लाट्या बनविल्या
  4. लाटून त्यावर सारण भरून करंजी बनवून तेलात तळून घेतल्या
  5. पातेल्यात साखर टाकून पाणी टाकून उकळवून एकतारी पाक करून घेतला त्यात लिंबूरस अर्धा चमचा टाकून मिसळून घेतलं
  6. पाकात करंज्या टाकून 10 मी.मुरू दिल्या
  7. पाकातून काढून ड्रायफ्रूट टाकून सर्व्ह केल्या

My Tip:

पाकात 10 मी.मुरू द्याव्या त्यामूळे पाक आत जाऊन मुरतो

Reviews for Chachnichi Karanji Recipe in Marathi (0)