अळूच्या पानांचे मुठिया | Colocasia Leaves Muthia Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Colocasia Leaves Muthia recipe in Marathi,अळूच्या पानांचे मुठिया, Sujata Hande-Parab
अळूच्या पानांचे मुठियाby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

4

0

अळूच्या पानांचे मुठिया recipe

अळूच्या पानांचे मुठिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Colocasia Leaves Muthia Recipe in Marathi )

  • बेसन - १ कप
  • गहू पीठ - ४ टेबलस्पून
  • अळूची पाने -३/४ कप (बारीक चिरून आणि दाबून घेतलेली)
  • तीळ सफेद - १/२ टेबलस्पून.
  • चिंचेची पेस्ट - १ टिस्पून
  • हिंग - १/२ टिस्पून
  • धणे पूड - १/२ टिस्पून
  • जिरेपूड - १/२ टिस्पून
  • हळद - १/२ टिस्पून
  • लाल तिखट - १ टिस्पून
  • बेकिंग सोडा - १/४ टीस्पून
  • किसलेला गूळ - १/२ टिस्पून
  • ताजे आले - १ टीस्पून जाडसर वाटलेले 
  • हिरवी मिरची - २ जाडसर वाटलेले 
  • लसूण पाकळ्या - ३ जाडसर वाटलेले 
  • चवीनुसार मीठ
  • तेल - तळण्यासाठी- १ टेबलस्पून + २ टीस्पून फोडणी
  • पाणी - १/२ -१ टेबलस्पून (थोडे थोडे वापरावे) 
  • फोडणीसाठी - कढीपत्ता पाने - ३-४
  • तीळ सफेद - १/२ टेबलस्पून 
  • जिरे - १/२ टेबलस्पून 
  • हिंग - १/४ टीस्पून

अळूच्या पानांचे मुठिया | How to make Colocasia Leaves Muthia Recipe in Marathi

  1. अळूची पाने चांगली धुवून, पुसून फूड प्रोसेसरच्या वापरून एकदम बारीक करून घ्या. किंवा चिरून घ्या.
  2. चिंचेची पेस्ट आणि मीठ घाला. बारीक चिरलेली पानांवर चांगले चोळून घ्या. 15 मिनिटे बाजूला ठेवा
  3. एका वाडग्यात बेसन, गव्हाचे पीठ, जीरे, धणे पूड, लाल मिरची पूड, हिंग, बेकिंग सोडा, तेल, पांढरे तीळ, किसलेले गूळ, जाडसर वाटलेले ताजे आले आणि हिरवी मिरची ,लसूण घ्या. चांगले मिक्स करा.
  4. अळूची पानाचे मिश्रण घाला. चांगले मिक्स करून घ्या.
  5. थोडेसे मीठ घालावे. चांगले मिक्स करावे. आपण आधीच अळूच्या पानांना मीठ लावून घेतलेले आहे.
  6. एकावेळी थोडे थोडे पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. हे थोडे चिकट होईल. कणिक मळतो तसे एकत्र करून घ्या.
  7. हात वर थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. मिश्रणाचे दोन लंबकार (४-५ इंच लांब) गोळ्यांमध्ये विभाजन करा.
  8. प्लेट वर थोडे तेल पसरवून घ्या आणि बनवलेले लॉग्स त्यावर ठेवा.
  9. स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवुन घ्या. (प्रेशर कूकरचा वापर केल्यास, 3 शिट्ट्यासाठी शिजवा आणि स्टीमरमध्ये 20-22 मिनिटे ते शिजवावे.
  10. गॅस बंद करा. कुकरच्या दाब सहजपणे खाली येऊ द्या.
  11. थंड होऊ द्या. दीड इंच जाड काप करून घ्या.
  12. एका कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता पाने घाला. काही सेकंद ढवळा.
  13. जिरे, पांढरे तीळ, घालून त्यांना तडतडू द्या.
  14. हिंग घाला. परतून घ्या.
  15. कापलेल्या मुठिया किंवा वड्यां घाला आणि गोल्डन ब्राऊन, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  16. चहा, कॉफ़ीसह गरम सर्व्ह करा.

My Tip:

जास्त घट्ट गोळे बनवू नका. ते वाफवल्यावर एकदम कडक होतील. दुधाचे अळू किंवा गडद हिरवे असणारे अळू वापरा.

Reviews for Colocasia Leaves Muthia Recipe in Marathi (0)