मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak / Steamed Modak by Renu Chandratre at BetterButter
2374
5
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Jul-14-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

गणपती बाप्पा चे लाडके सुगंधी उकडीचे मोदक

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ पीठ १ वाटी.
  2. गूळ १ वाटी
  3. तेल / तूप २-३ मोठे चमचे
  4. वेलची पूड १/४ चमचा
  5. जायफळाची पूड १/२ चमचा
  6. खवलेले ओले खोबरे १
  7. खसखस भाजलेली २-४ चमचे
  8. तीळ भाजलेले २-४ चमचे
  9. पाणी २ वाटी
  10. साखर १ चमचा
  11. बारीक चिरून मिश्र सूका मेवा १ मोठा चमचा
  12. मीठ १/४ चमचा

सूचना

  1. सर्वप्रथम एका मोठ्या भाण्यात १-२ वाटी पाणी , तूप ,.मीठ आणि साखर घालून उकळी येऊ द्या
  2. यात तांदूळ पीठ घालावे आणि व्यवस्थित मिक्स करावे
  3. गैस बंद करून ५-१० मिनिटे झाकून ठेवावे
  4. हाताला तूप लावून, पीठ मउ आणि सारखे करून झाकून ठेवा
  5. कढईत तूप गरम करा आणि गूळ, खोबरे, सूका मेवा , वेलची पूड आणि जायफळाची पूड घालावी
  6. ५-१० मिनिटे मंद आचेवर शीजवून घ्या आणि गार होऊ द्या
  7. तयार पीठाची पारी बनवा, त्यात १-२ चमचे सारण भरा, पाकळ्या बनवत , मोदक तयार करा.
  8. अशाप्रकारे सर्व मोदक तयार करा
  9. मोदक पात्रात पाणी गरम करा
  10. एका थाळी वर तूपाचा हात लावून, त्यावर सर्व मोदक ठेवा
  11. केळीच्या पानावर पण मोदक ठेवू शकता
  12. सर्व मोदक १०-१५ मिनिटे वाफवून घ्या
  13. मोदक वर तूपाची धार सोडून बाप्पा मोरया ला नैवेद्य दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर