नमकीन चंपाकली | Namkin Champakali Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Namkin Champakali recipe in Marathi,नमकीन चंपाकली, Bharti Kharote
नमकीन चंपाकलीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    40

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

नमकीन चंपाकली recipe

नमकीन चंपाकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Namkin Champakali Recipe in Marathi )

  • दोन वाटी मैदा
  • एक चमचा काॅरन फलोवर
  • अर्धी वाटी पालक पयुरी (पालक 5 मी.वाफवून मिक्सर मधून वाटून घ्या )
  • अर्धा चमचा ओवा
  • पाव चमचा कसूरी मेथी
  • पाव चमचा जीरे पूड
  • अर्धी वाटी तेलाचे मोहन
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • तळण्यासाठी तेल

नमकीन चंपाकली | How to make Namkin Champakali Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात मैदा घ्या. .त्यात काॅरन फलोवर ओवा मीठ कसूरी मेथी तेलाचे मोहन जीरे पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  2. मैदा दोन भागात डिवाईड करा.एक भाग पाणी घालून भिजवा. .आणि दुसरा भागात पालक पयुरी घालून भिजवा. .
  3. दोन्ही गोळे 15 मी.बाजूला ठेवा. ..
  4. आता पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .मंद आचेवर
  5. आता पोळपाटावर लांबट आकाराच्या छोट्या पूरया लाटा..
  6. चाकू ने सरळ पटटया कापून घ्या. .ईमेज मध्ये बघा. .
  7. आता रोल करून घ्या. .आणि दोन्ही टोक विरुद्ध दिशेने फिरवा..
  8. अशाच सर्व चंपाकळी बनवून घ्या. .
  9. आणि मध्यम आचे वर खमंग तळून घ्या. .टोमॅटो साॅस किंवा चहा सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

हिरवा रंगासाठी मी पालक पयुरी वापरली तूम्ही फूड कलर वापरू शकता. .

Reviews for Namkin Champakali Recipe in Marathi (0)