Photo of Puran stuffed in chapati by Bharti Kharote at BetterButter
731
2
0.0(0)
0

पूरणपोळी

Jul-15-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पूरणपोळी कृती बद्दल

अतिशय लोकप्रिय पाककृती. ..सणासुदीला ग्रामीण भागांत अजूनही फक्त पूरणपोळीच बनविली जाते...

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • कठीण
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. 200 ग्रॅम चनाडाळ
  2. 200 ग्रॅम गुळ
  3. मैदा एक वाटी
  4. गव्हाचे पीठ अर्धी वाटी
  5. तेल
  6. चिमूटभर मीठ
  7. दूध
  8. चिमूटभर वेलची पूड
  9. साजूक तूप

सूचना

  1. कूकर मधून चना डाळ सात शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. .
  2. डाळीच पाणी नितरून मिक्सर मधून वाटून घ्या. .
  3. डाळ चिकन वाटून घ्या. .
  4. गॅस वर कढईत गुळ घालून लो फ्लेम करा.
  5. त्यात वाटलेली डाळ घालून चांगल हलवा. .
  6. 15 मी.मंद आचेवर एकजीव होऊ दया. .
  7. तोपर्यंत एका वाडग्यात गव्हाचे पीठ मैदा तेल मीठ दूध घालून पीठाचा गोळा मळून घ्या. .
  8. मळलेला गोळा 15 मी...ओल्या कपड्यात झाकून ठेवा. .
  9. आता पूरण कढई तून काढून घ्या. .
  10. त्यात वेलची पूड किवा जायफळ पूड घाला. .आणि एकजीव करा. .
  11. आता पूरण स्टफ करण्यासाठी ऊंडा बनवून घ्या
  12. त्यात पूरण स्टफ करून घ्या. .
  13. त्याचा मोदक बनवून टोकाचे पीठ काढून टाका. ..ऊंडा कोरडया पिठात बुडवून हलक्या हाताने लाटणे फिरवा...
  14. पोळीचे काठ लाटून छान मोठी पोळी बनवा. .
  15. पोळी फाटणार नाही याची काळजी घ्या. ..
  16. हळूच उचलून तव्यावर टाका. ..
  17. एका बाजूने भाजली की उलटून टाका. .आणि त्या वर तूप घालून खमंग भाजून घ्या. .
  18. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा...
  19. आणि आमरस खिर दूधा सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर