मिक्स पिठाचे थालीपीठ | Mix flour thalipeeth Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix flour thalipeeth recipe in Marathi,मिक्स पिठाचे थालीपीठ, Manisha Sanjay
मिक्स पिठाचे थालीपीठby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

5

0

मिक्स पिठाचे थालीपीठ recipe

मिक्स पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix flour thalipeeth Recipe in Marathi )

  • ज्वारी पीठ - एक वाटी
  • गव्हाचे पीठ - अर्धा वाटी
  • तांदूळ पीठ - पाव वाटी
  • बेसन पीठ - पाव वाटी
  • तीळ - २ छोटे चमचे
  • कांदा किसून - १ वाटी
  • हळद - १/२ छोटा चमचा
  • कोथिंबीर चिरून - १/२ वाटी
  • जिरे पूड - १/२ छोटा चमचा
  • ओवा - १/२ छोटा चमचा
  • मीठ चवी नुसार
  • हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
  • तेल लागेल असे
  • पाणी लागेल असे

मिक्स पिठाचे थालीपीठ | How to make Mix flour thalipeeth Recipe in Marathi

  1. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
  2. त्यात हळूहळू पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. पीठ भाकरी साठी मळतो असे असावे.
  3. पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.
  4. पोळपाट वर ओला सुती कपडा घेऊन त्या वर हाताने थालीपीठ थापावे.
  5. थालीपीठ कपड्या सह गरम तव्यावर टाकावे आणि कापड काढून घ्यायचे.
  6. तेल घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.
  7. असेच सर्व थालीपीठ करून घ्या.
  8. लोणी/दही/ चटणी सोबत खायला द्यावे.

My Tip:

आवडी प्रमाणे ह्यात भाज्या बारीक चिरून टाकू शकतो.

Reviews for Mix flour thalipeeth Recipe in Marathi (0)