मालवणी वडे | Malvani vade Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Malvani vade recipe in Marathi,मालवणी वडे, Manisha Sanjay
मालवणी वडेby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    3

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

7

0

मालवणी वडे recipe

मालवणी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Malvani vade Recipe in Marathi )

  • ज्वारी पीठ - १/२ वाटी
  • गव्हाचे पीठ - १/२ वाटी
  • बेसन पीठ - १/४ वाटी
  • तांदूळ पीठ - १/२ वाटी
  • उडीद डाळ - १/४ वाटी
  • मेथी दाणे - १ छोटा चमचा
  • धणे - १ छोटा चमचा
  • हळद - १/२ छोटा चमचा
  • कांदा चिरुन - १/२ वाटी
  • जिरे - १/२ छोटा चमचा
  • मिठ चवीनुसार
  • कोथिंबीर चिरून - १/४ वाटी
  • हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी
  • पाणी लागेल असे

मालवणी वडे | How to make Malvani vade Recipe in Marathi

  1. प्रथम उडीद डाळ, मेथी दाणे २ तास भिजत घालून ठेवा.
  2. २ तासा नंतर डाळ, मेथी दाणे, धणे, जिरे, कांदा बारीक वाटून घ्या.
  3. सर्व पिठे, वाटलेले मिश्रण, हळद, मीठ, मिरची पेस्ट आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या. पीठ भाकरी च्या पिठा सारखे असले पाहिजे.
  4. पोळपाट वर ओला सुती कपडा घेऊन त्या वर हाताने छोटे छोटे वडे करून घ्या.
  5. कढई मध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर वडे तळून घ्या.

My Tip:

वडे असेच सुद्धा खायला चांगले लागतात. चिकन करी किंवा काळे वाटाणे करी सोबत खायला द्यावे.

Reviews for Malvani vade Recipe in Marathi (0)