खवा , बेसन पोळी | KHAVA BESAN POLI Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KHAVA BESAN POLI recipe in Marathi,खवा , बेसन पोळी, आदिती भावे
खवा , बेसन पोळीby आदिती भावे
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

खवा , बेसन पोळी recipe

खवा , बेसन पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHAVA BESAN POLI Recipe in Marathi )

  • सारणासाठी -खवा 1 वाटी
  • बेसन 1 वाटी
  • गहु पीठ 2 चमचे
  • खसखस 1 चमचा
  • जायफळ पावडर 1 चमचा
  • सुके खोबरे भाजून बारीक केलेलं - 4 चमचे
  • पीठी साखर दिड वाटी
  • पारीसाठी- 1 वाटी मैदा
  • 4 चमचे बारीक रवा
  • 4चमचे गहू पीठ
  • मोहन तुपाचे -2 चमचे
  • मीठ चिमूटभर

खवा , बेसन पोळी | How to make KHAVA BESAN POLI Recipe in Marathi

  1. मैदा , गहु पीठ, रवा मिठ घालून मिक्स करावे तुपाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवून ठेवावे बेसन नुसते भाजावे, खसखस भाजून घ्यावी, त्यात खवा भाजून घालावा यात बेसन मिक्स करून घ्यावे खोबरं घालावं सगळं भाजून घ्यावे गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व जायफळ पूड घालावी, चांगले मळावे पिठाची व सारणाची consistancy सारखी असावी. दोन लाट्या पिठाच्या व एक सारणाची असे घ्यावे. दोन पीठांच्या लाट्यात एक सारणाची लाटी घालून सगळीकडून बंद करावे मग हलक्या हाताने तांदळाच्या पिठावर लाटून घ्यावे मग तव्यावर मंद गॅसवर तूप सोडून भाजावे पोळी तयार आहे

My Tip:

प्रवासासाठी , मुलांच्या डब्यात छान खाऊ आहे

Reviews for KHAVA BESAN POLI Recipe in Marathi (0)