कांदे पोहे | KANDE POHE Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • KANDE POHE recipe in Marathi,कांदे पोहे, जयश्री भवाळकर
कांदे पोहेby जयश्री भवाळकर
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

कांदे पोहे recipe

कांदे पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KANDE POHE Recipe in Marathi )

  • 2 कप जाडे पोहे
  • 1चमचा साखर
  • 1 1/2 चमचा मिठ
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 छोटे छोटे टुकडे केलेला बटाटा
  • 1 हिरवी मिर्ची बारीक चिरलेली
  • 1/4 चमचा हळद
  • 1/2 चमचा राई
  • 1/2चमचा बडी शोप
  • 1 चमचा तेल
  • 1 लिंबा चा रस
  • 2 चमचे चिरलेली कोथिंबीर
  • 2 चमचे अनार दाणे

कांदे पोहे | How to make KANDE POHE Recipe in Marathi

  1. एका भांड्यात पोहे पाण्यानी धुवून घ्या आणि पाणी पूर्ण काढून घ्या
  2. आता एक पॅन मधे तेल गरम करा
  3. त्यात राई,शोप घालून कांदा, हिरवी मिर्ची घालून नीट परतून घ्या.
  4. आता ह्या फोडणीत बटाटा घालून झाकून शिजवून घ्या.
  5. इकडे पोह्यात साखर,मिठ घालून नीट मिक्स करा.
  6. आता हे पोहे पॅन मधील फोडणीत घालून नीट मिक्स करून घ्या आणि झाकून एक वाफ येऊ द्या.
  7. आता पोह्यांवर लिंबा चा रस आणि कोथिंबीर घाला
  8. हे पोहे एक वाफ निघून गेल्या वर टिफिन बॉक्स मध्ये अनार दाणे नी सजवून पैक करा.म्हणजे गरम पण राहतील आणि साजळणार पण नाही.

My Tip:

फोडणीत बटाटा च्या ऐवजी कांदे घालायच्या आधी 1 चमचा कच्चे शेंगदाणे तळून घाला.

Reviews for KANDE POHE Recipe in Marathi (0)