त्रि रंगाची इडली | Tri colour idali Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  17th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Tri  colour idali recipe in Marathi,त्रि रंगाची इडली, seema Nadkarni
त्रि रंगाची इडलीby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    17

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

त्रि रंगाची इडली recipe

त्रि रंगाची इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tri colour idali Recipe in Marathi )

  • 3 कप - तांदूळ
  • 1 कप - ऊडद डाळ
  • 1 चमचा मेथी दाणे
  • केशरी रंगाचे गाजर ची पेस्ट - 1/4 कप
  • पालक ची पेस्ट - 1/4 कप
  • चवी पुरते मीठ आणि काळे मिरे पावडर

त्रि रंगाची इडली | How to make Tri colour idali Recipe in Marathi

  1. 3 कप तांदूळ धुवून भिजवून घ्या
  2. 1 कप ऊडद डाळ धुवून भिजवून घ्या
  3. उडदाच्या डाळीत 1 चमचा मेथी दाणे घालून घ्या
  4. तांदूळ आणि डाळ 7-8 तास भिजत ठेवा
  5. 7-8 तासाने मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.
  6. या मिश्रणाला 7-8 तास गरम जागेवर ठेवावे
  7. इडली चे मिश्रण तयार झाले की त्यात मीठ आणि काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे
  8. तीन छोट्या वाटीत मिश्रण वेगळे करून घ्या, एका वाटीत गाजर ची पेस्ट एकत्र करावे.
  9. दूसरया वाटीत पालक पेस्ट घालून एकत्र करावे.
  10. इडली च्या पात्रात पाणी घालून गरम होवू द्या
  11. इडली स्टेन्ड मध्ये गाजर चे मिश्रण घालावे, त्या मध्ये पांढरे मिश्रण घालावे, शेवटी पालकाचे मिश्रण घालून घ्या
  12. इडली स्टेन्ड ला गरम झाले ल्या पात्रता ठेवून 15-20 मिनिटे स्टिम करून घ्या.
  13. तयार झालेल्या इडली ला चटणी आणि सांबर बरोबर सवॅ करा

Reviews for Tri colour idali Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo