मुख्यपृष्ठ / पाककृती / टिफीन १ कांदा बटाटा रस्सा भाजी

Photo of Tiffin 1 onion potato bhaji by deepali oak at BetterButter
875
4
0.0(0)
0

टिफीन १ कांदा बटाटा रस्सा भाजी

Jul-17-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टिफीन १ कांदा बटाटा रस्सा भाजी कृती बद्दल

डबा म्हटले कि त्यात काय आहे हे नेणाऱ्याला आज काय दिले आहे हे पाहण्याची ऊत्सूकता असते..दरवेळी नवीन डबा देण्याचे कौशल्य प्रत्येक स्त्री मध्ये असतेच.डब्यातला मुख्य पदार्थ म्हणजे भाजी कांदा बटाटा रस्सा भाजी करायला सोप्पी व चवदार होते.वेळही वाचतो व पटकन होते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे २
  2. मोठ्ठा कांदा १
  3. टोमेटो २
  4. जीरे
  5. मोहरी
  6. हिंग हळद
  7. कांदा लसूण मसाला
  8. मीठ
  9. खोबरे किसुन
  10. कोथिंबीर
  11. गुळ (ऐच्छिक)
  12. सब्जी मसाला
  13. पाणी
  14. तेल

सूचना

  1. कांदा लांब ऊभा चीरावा
  2. बटाटे व टोमेटो पातळ काप ऊभे चीरावे
  3. कढईत तेल तापले कि जीरे मोहरी घालावे
  4. कांदा परतावा
  5. आता ह्यात टोमॅटो परतावे
  6. हिंग हळद सब्जी मसाला घालावा
  7. कांदा लसुण मसाला घालावा
  8. बटाटे घालून परतून मीठ घालावे
  9. आता ह्यात एक ग्लास पाणी घालून मध्यम आचेवर शिजु दया
  10. शेवटी कोथिंबीर व खोबरे गुळ घालून एक वाफ आली कि ऊतरावे
  11. जीरा राईस व ज्वारीच्या भाकरी सोबत डब्यात भरून लंच बाॅक्स रेडी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर