कांदा बटाटा पोहे | Kanda Batata Poha Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kanda Batata Poha recipe in Marathi,कांदा बटाटा पोहे, Sujata Hande-Parab
कांदा बटाटा पोहेby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

कांदा बटाटा पोहे recipe

कांदा बटाटा पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda Batata Poha Recipe in Marathi )

  • पोहा - 1 1/2 कप (पूर्णपणे धुऊन आणि गाळून घ्यावे.)
  • उकडलेले आणि मध्यम किंवा बारीक तुकडे केलेले बटाटे - २ छोटे किंवा १ मोठा
  • मोहोरी - 1/2 टीस्पून
  • जिरे - 1/2 टीस्पून
  • कढीपत्ता - 4-५ पाने
  • कांदा मध्यम - 1 बारीक चिरून
  • हिरव्या मिरच्या - 2 बारीक चिरून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर पाने - 1 1/2 टेबलस्पून 
  • हळद पावडर - 1/2 टिस्पून
  • साखर - 1 टेबलस्पून 
  • तेल - 1 टेबलस्पून 
  • भाजलेले शेंगदाणे - 1 1/2 टेबलस्पून 
  • ताजे किसलेला नारळ - 1/2 टेबलस्पून (पर्यायी)
  • चवीनुसार मीठ
  • सर्व्हिंगसाठी - बारीक शेव् लिंबू तुकडे , बारीक चिरलेला कांदा

कांदा बटाटा पोहे | How to make Kanda Batata Poha Recipe in Marathi

  1. एक कढई किंवा नॉनस्टिक्स पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घाला. त्याला तडतडू द्या कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  2. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर पाने टाका. 1 मिनिट शिजू द्या.
  3. हळद, साखर घाला. साखर विरघळे पर्यंत चांगले मिक्स करावे.
  4. उकडून बारीक केलेले बटाट्याचे तुकडे घालावे आणि मिक्स करावे.
  5. धुतलेले आणि गाळून घेतलेले पोहे घाला. हलक्या हाताने मिक्स करावे किंवा ते टॉस करा
  6. भाजलेले कुटलेले शेंगदाणे आणि किसलेले नारळ घाला. हलक्या हाताने मिक्स करावे.
  7. कोणतीही मसालेदार किंवा फ्लेवर्स शेव् घाला
  8. बारीक चिरलेला कांदा घाला.
  9. लिंबू तुकडे आणि चहा किंवा कॉफी बरोबर गरम सर्व्ह करा.

My Tip:

पोह्याचे मिश्रण अतिशय हळू ढवळा सर्वोत्तम परिणामासाठी जाड पोहा वापरा. जास्त भिजवून ठेवू नका नाहीतर अंतिम डिश मऊ होईल.

Reviews for Kanda Batata Poha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo