Photo of Set Dosa by Sujata Hande-Parab at BetterButter
1267
4
0.0(0)
0

सेट डोसा

Jul-18-2018
Sujata Hande-Parab
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेट डोसा कृती बद्दल

सेट डोसा हि कर्नाटक ची पॉप्युलर डिश आहे आणि नारळ चटणी किंवा सागू (एक अतिशय स्वादिष्ट भाजी) बरोबर सर्वोत्तम लागते. सेट डोसा हे स्पॉंजी आणि अतिशय नरम असतात. नाश्त्यासाठी, दुपारचं जेवण किंवा डिनरसाठी किंवा टिफिन मध्ये खाल्ले जातात. उपाहारगृहांमध्ये किंवा छोट्या स्टॉल वर हे नावाप्रमाणेच, नेहमी एका सेटमध्ये तीन असे सर्व्ह केले जातात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. इडली किंवा डोसा तांदूळ - २ कप
  2. उडीद डाळ - १ कप 
  3. चणा डाळ - 2-3 टेबलस्पून 
  4. मेथीचे दाणे - 1 टेबलस्पून
  5. पोहे - ३/४ -१ कप
  6. पाणी - 2-3 कप रात्रभर भिजवण्यासाठी - मिश्रणासाठी १-३/४ कप
  7. तेल - 3-4 टेबलस्पून
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. उडीद डाळ, चणा डाळ, मेथीचे दाणे एकत्र आणि तांदूळ वेग वेगळे रात्रभर पाण्यात भिजवा.
  2. दुसऱ्या दिवशी डोसा करण्याआधी एक तासासाठी पोहा भिजवावा.
  3. दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकून उडीस डाळीचे मिश्रण आणि तांदूळ पोह्याचे मिश्रण वेगवेगळे मिक्सर ला लावून वाटून घ्यावे. वाटताना आवश्यकता लागल्यास थोडे पाणी घालावे.
  4. दोन्ही मिश्रणे एकत्र करावीत. आवश्यकतेनुसार पाणी घालावे आणि मिश्रणाची कन्सिस्टसी एड्जस्ट करावी.
  5. मिठ घालावे आणि पिठ व्यवस्तीत ढवळून घ्यावे.
  6. एका मोठ्या टोपात किंवा वाडग्यात ओतावे आणि १० तास फुलण्यासाठी ठेवून द्यावे.
  7. फुलल्यानंतर एका नॉनस्टीक पॅन मध्ये तेल पसरवून घ्यावे. टिशु पेपर ने किंवा स्वच्छ कपड्याने पॅन पुसून घ्यावे.
  8. एक खोलगट चमच्याने मिश्रण अलगद गोलाकार पसरवावे. जास्त वेळ चमच्याने पसरवू नये. आपल्याला थोडा जाड आणि स्पॉंजी डोसा हवा आहे.
  9. 10-12 सेकंद एका प्लेटने झाकून ठेवा. प्लेट काढून घ्या आणि डोसा पॅनच्या कडा सोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
  10. सगळे डोसे असा प्रकारे बनवून घ्या.
  11. नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर