कांदा मेथी व नाचणी ची चपाती | Methi onion sabji nd nagli chapati Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Methi onion sabji nd nagli chapati recipe in Marathi,कांदा मेथी व नाचणी ची चपाती, priya Asawa
कांदा मेथी व नाचणी ची चपातीby priya Asawa
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

कांदा मेथी व नाचणी ची चपाती recipe

कांदा मेथी व नाचणी ची चपाती बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi onion sabji nd nagli chapati Recipe in Marathi )

  • मेथीच्या भाजी साठी
  • बारीक चिरलेली मेथीची भाजी 2 कप
  • बारीक चिरलेला कांदा 1 कप
  • हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट 1 चमचा
  • तेल फोडणी साठी
  • मोहरी, जीरे, हिंग फोडणी साठी
  • हळद 1/2 चमचा
  • मीठ चवीनुसार
  • पोळी साठी
  • गव्हाचे पीठ 2 वाटी
  • नाचणी चे पिठ 3 चमचे
  • दुधाची साय 2 चमचे
  • चांगले तुप 2 चमचे
  • मीठ चवीनुसार

कांदा मेथी व नाचणी ची चपाती | How to make Methi onion sabji nd nagli chapati Recipe in Marathi

  1. पोळी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून पिठ मळून घ्या व भिजवून ठेवा
  2. भाजीचा फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी द्यावी व कांदा घालून परतून घ्यावा, हिरवी मिरची व कढीपत्तयाची पेस्ट, हळद घालून थोडे परतुन घ्या मेथीची भाजी व मीठ घालून वाफवून घ्या
  3. भिजवून ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या लाटुन, चांगले तुप लावुन खरपूस भाजून घ्या
  4. आपली पोळ्या व भाजी तयार
  5. व छोट्या टिफिन मध्ये ओल्या खजूर द्या

My Tip:

कढीपत्ता पोटात गेलेला चांगला असते पण अशे कोणीच खात नाही तर भाज्यात कढीपत्तयाची पेस्ट करून वापरावी भाजीला टेस्ट छान येते

Reviews for Methi onion sabji nd nagli chapati Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo