राजमा मसाला करी | Rajma Masala curry Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rajma Masala curry recipe in Marathi,राजमा मसाला करी, Renu Chandratre
राजमा मसाला करीby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

राजमा मसाला करी recipe

राजमा मसाला करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajma Masala curry Recipe in Marathi )

  • राजमा १ वाटी
  • कांदा पेस्ट १ वाटी
  • टोमॅटो ची पेस्ट २ वाटी
  • आले लसूण पेस्ट २ छोटे चमचे
  • हळद पावडर १/२ चमचा
  • लाल तिखट १ चमचा
  • धणे पूड २ चमचे
  • गरम मसाला १/२ चमचा
  • मीठ चवीनुसार
  • उभी चिरलेली हिरवी मिरची १-२
  • कोथिंबीर १ मोठा चमचा
  • तेल २ मोठे चमचे
  • जीरे १ चमचा

राजमा मसाला करी | How to make Rajma Masala curry Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम रात्री राजमा धून , पर्याप्त पाण्यात भिजवून ठेवा
  2. सकाळी ५-६ तासात तो पुर्णपणे भिजून फुगलेला असेल
  3. आता, यात चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून , ४-५ शिट्या देऊन प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्यावे
  4. राजमा शिजेपर्यंत , एका कढईत ,२ मोठे चमचे तेल गरम करा
  5. जीरे टाका , लगेच कांदा पेस्ट आणि आले लसूण पेस्ट टाका
  6. थोडी परतून घ्यावे
  7. आता , लाल तिखट, धणे पूड आणि गरम मसाला घालून मिक्स करावे
  8. टोमॅटो पेस्ट टाका आणि तेल सुटे पर्यंत मसाला भाजून घ्यावा
  9. आता यात शिजलेला राजमा घालावे
  10. व्यवस्थित मिक्स करावे, चवी पुरते मीठ आणि थोडे पाणी घालून , झाकण लावून ,५ -१० मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यावे
  11. हिरवी मिरची , कोथिंबीरनि सजवून राजमा मसाला , डब्याला पॅक करावे
  12. माझा डबा राजमा मसाला सोबत, मऊ तूप लावून फुलके
  13. खूपच चविष्ट आणि हेल्दी देखील

My Tip:

मसाले गरजे प्रमाणे कमी जास्त करू शकता

Reviews for Rajma Masala curry Recipe in Marathi (0)