मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्वारीच्या शेंगा आणि बटाट्या ची सुकी भाजी

Photo of Cluster beans Potato dry Veg by Renu Chandratre at BetterButter
646
4
0.0(0)
0

ग्वारीच्या शेंगा आणि बटाट्या ची सुकी भाजी

Jul-19-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्वारीच्या शेंगा आणि बटाट्या ची सुकी भाजी कृती बद्दल

गवार फळी आणि बटाट्याची चटपटीत आंबट गोड भाजी , पोळी - पुरी- पराठा सोबत खूपच छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. गवारीच्या शेंगा चिरून २ वाटी
  2. बटाटा सोलून पातळ काप केलेला १
  3. बारीक चिरलेला कांदा १
  4. बारीक चिरलेला टोमॅटो १-२
  5. ठेचलेला लसूण १ चमचा
  6. तेल १ मोठा चमचा
  7. मोहरी १/२ चमचा
  8. जिरे १/२ चमचा
  9. हिंग एक चिमूट
  10. हळद पावडर १/२ चमचा
  11. लाल तिखट १/२ चमचा
  12. गरम मसाला १/२ चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. गूळ २ छोटे चमचे
  15. कोथिंबीर सजावटी करता

सूचना

  1. सर्वप्रथम गवारीच्या शेंगा तोडून , त्यांचा दोरा काढून धुवून घ्या
  2. बटाटा सोलून ,पातळ काप करा
  3. कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी जिरे घाला
  4. चिमूट भर हिंग घालून लगेच बारीक चिरलेला कांदा आणि ठेचलेले लसूण घाला
  5. जरा वेळ परतून घ्यावे आणि गवारीच्या शेंगा आणि बटाटा घालावे
  6. वर हळद , तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करावे
  7. झाकून ५-१० मिनिटे शिजवा , अधून मधून परतत रहा
  8. भाजी शिजली की , टोमॅटो आणि गूळ घालून मिक्स करावे
  9. आणि झाकण काढून ५ मिनिटे अजून शिजवावे की भाजी तयार
  10. कोथिंबीर घालून , पोळी , पराठा किंवा पुरी सोबत टिफिन ला पॅक करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर